योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते महाकुंभमेळाच्या लोगोचे अनावरण

Kumbh Mela 2025 | 'प्रयागराज'मध्ये महाकुंभमेळा वेबसाइट आणि अँपदेखील लॉन्च
उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ. ( संग्रहित छायाचित्र )
उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ. ( संग्रहित छायाचित्र ) File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी प्रयागराजमध्ये महाकुंभ-2025 च्या लोगोचे अनावरण आज (दि.६) करण्यात आले. या सोबतच महाकुंभ मेळ्यासाठी वेबसाइट आणि ॲपचे देखील लॉन्चिंग झाले. या संदर्भातील व्हिडिओ 'एएनआय'ने शेअर केला आहे.

प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभ-2025 साठीच्या लोगोमध्ये कुंभ राशीचे चिन्ह कलश आहे. ज्यामध्ये ओम लिहिलेले आहे. मागे संगमाचे दृश्य आहे. तसेच भगवान हनुमानजींचे चित्र व मंदिर आहे. अनावरणासोबतच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत महाकुंभाच्या तयारीची आढावा बैठक झाली.

२०२५ मध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइट आणि ॲपमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. महाकुंभ 2025 चा लोगो महाकुंभ वेबसाइट आणि ॲपवर इतर प्रचार माध्यमांसह वापरला जाईल. भाविक आणि पर्यटकांना महाकुंभला विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने पोहोचण्यासाठी वेबसाइट मार्गदर्शक म्हणून काम करेल. याद्वारे प्रयागराजमधील निवास व्यवस्था, स्थानिक वाहतूक, पार्किंग, घाटावर जाण्याचे दिशानिर्देश आदींची माहिती उपलब्ध होणार आहे. यात स्थानिक आणि जवळपासची आकर्षणे आणि पर्यटन स्थळांसाठी मार्गदर्शक देखील आहेत. जत्रेच्या परिसरात कसे जायचे आणि धार्मिक कार्यात सहभागी कसे व्हावे याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news