देश कमळाच्या चक्रव्युहात; राहुल गांधी यांचा सरकारवर घणाघाती हल्लाबोल

परीक्षांचे पेपर फुटणे हा आजच्या तरुणांचा मुख्य प्रश्न
Rahul Gandhi News
देश कमळाच्या चक्रव्युहात; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्लाबोलPudhari File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देश कमळाच्या चक्रव्युहात अडकला असल्याची टीका विरोधी पक्षनेते, कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सरकारवर केली आहे. राहुल गांधी म्हणाले, कोविडच्या काळात तुम्ही छोटे उद्योग उद्ध्वस्त केले, परिणामी बेरोजगारी वाढली. तुम्ही तरुणांसाठी काय केले? असा सवाल करीत राहुल गांधी पुढे म्हणाले, "तुम्ही इंटर्नशिप प्रोग्रामबद्दल बोललात. हा बहुधा विनोद असावा. भारतातील 500 कंपन्यांमध्ये तिचा समावेश असल्याचे तुम्ही सांगितले. पण तुम्ही आधी तुम्ही पाय मोडला आणि आता तुम्ही त्यावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करत आहात." अशा शब्दांत त्यांनी लोकसभेत बोलताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

'परीक्षांचे पेपर फुटणे हा आजच्या तरुणांचा मुख्य प्रश्न'

सभागृहात बोलताना राहुल गांधी म्हणाले,  "परीक्षांचे पेपर फुटणे हा आजच्या तरुणांचा मुख्य प्रश्न बनला आहे. आपण जिथे जातो तिथे बेरोजगारी असल्याचे ते सांगतात. एका बाजुला पेपर फुटीचे चक्रव्यूह तर दुसरीकडे बेरोजगारीचे चक्रव्यूह आहे. दहा वर्षांत जवळपास ७० वेळा पेपर फुटले आहेत. अग्नीवीरच्या चक्रव्यूहात तुम्ही पहिल्यांदा लष्कराच्या जवानांना अडकवले. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही नाही. तुम्ही शेतकऱ्यांना एमएसपीचा अधिकार देत नाही. आजही त्यांचा रस्ता अडवला गेला आहे. शेतकऱ्यांना मला भेटू दिले नाही." असाही आरोप राहुल गांधी यांनी यावेळा केला. 

Rahul Gandhi News
Rahul Gandhi : आमच्या 'या' मागण्या छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याने प्रेरित : राहुल गांधी

चक्रव्यूह सहा लोक नियंत्रित करत आहेत : राहुल गांधी

भाजपमधील माझे मित्र, मंत्री, शेतकरी, कामगार आणि तरुण घाबरले आहेत. मी त्यावर खूप विचार केला. हजारो वर्षांपूर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे चक्रव्यूहमध्ये अभिमन्यूची सहा जणांनी हत्या केली होती. चक्रव्यूहात भीती, हिंसाचार आहे आणि अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून सहा जणांनी मारले."

राहुल म्हणाले की, संशोधन केल्यानंतर मला कळले की चक्रव्यूहचे दुसरे नाव पद्मव्यूह आहे, ते कमळाच्या आकाराचे आहे. चक्रव्यूह हा कमळाच्या फुलाच्या आकारात असतो. 21 व्या शतकात नवे चक्रव्यूह निर्माण झाले आहे, ज्याचे प्रतीक पंतप्रधान मोदी छातीवर धारण करतात. ज्या प्रकारे अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता, तसाच प्रकार भारताबाबत केला जात आहे. हे तरुण, शेतकरी, पालक यांच्यासोबत केले जात आहे."

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वत्थामा आणि शकुनी यांनी अभिमन्यूला घेरले होते आणि आजही चक्रव्यूहात सहा जण आहेत. सहा लोक केंद्रावर नियंत्रण ठेवतात, ते म्हणजे, नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news