

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका वकीलाला सुनावणी दरम्यान फटकारले. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाने इंग्रजीत 'या..या..' म्हटले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड नाराज झाले. त्यांनी वकिलाला फटकारले आणि म्हणाले- हे कॉफी शॉप नाही. हे काय आहे ‘या..या..' मला त्याची खूप अॅलर्जी आहे. याला परवानगी देता येणार नाही.
तुम्ही ‘येस’ म्हणा, हे ऐकून वकिलाने सांगितले की, ते पुण्याचे रहिवासी आहेत. वकिलांनी मराठीत युक्तिवाद करण्यास सुरुवात केली, यावर सरन्यायाधीशांनीही त्यांना मराठीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध अंतर्गत चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हा प्रसंग घडला.