

नवी दिल्ली : दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार दहशतवादी तहव्वुर हुसेन राणाच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी ९ जुलैपर्यंत वाढ केली. राणाला यापूर्वी सुनावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे हजर केल्यानंतर विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी हा आदेश दिला.
दरम्यान, राणाच्या वकिलाने प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर न्यायाधीशांनी तिहार जेलकडून ९ जूनपर्यंत दहशतवाद्याच्या प्रकृतीबद्दल स्थिती अहवाल मागितला. २६/११ चा मुख्य सूत्रधार राणाला ४ एप्रिल रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताकडे प्रत्यार्पणाविरुद्धची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर भारतात आणण्यात आले. न्यायालयाने गेल्या महिन्यात त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याअगोदर तो एनआयएच्या कोठडीत होता.