

Army vehicle accident: जम्मू काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील भादरवाह भागात भारतीय सैन्याची गाडी २०० फूट दरीत कोसळून १० जवान शहीद झाले आहेत. या अपघातात अनेक जवान जखमी देखील झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जवानांना घेऊन जाणारी भारतीय लष्कराची बुलेट प्रुफ गाडी ही उंचावरील पोस्टकडे चालली होती. त्यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी २०० फूट खोल दरीत कोसळळी.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मुळताच लष्कराची आणि पोलिसांच्या टीमने त्वरित मदत कार्य सुरू केलं. स्थानिक लोकांनी देखील पोलीस आणि रेस्क्यू टीमला मदत केली.
बचाव कार्यादरम्यान, १० जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तसेच जखमींना देखील बाहेर काढण्यात आलं. त्यांना गंभीर स्थितीत रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना हेलिकॉप्टरमधून उधमपूरच्या कमांड रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
लष्कराने दिलेल्या वक्तव्यानुसार या अपघाताची चौकशी सुरू केली असून जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवनांच्या कुटुंबियांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.