BMC Nominated Corporator: शिंदेंची डोकेदुखी वाढणार! एका जागेसाठी सहा जण इच्छुक; पदासाठी लॉबिंग जोरात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये एका जागेसाठी तब्बल सहा जण इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
eknath shinde
eknath shinde pudhari photo
Published on
Updated on

Shinde Shiv Sena BMC Nominated Corporator Lobbying: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सभागृहात 'स्वीकृत नगरसेवक' (Nominated Corporator) म्हणून कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये एका जागेसाठी तब्बल सहा जण इच्छुक असल्याने पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.

पक्षनिहाय बलाबल आणि स्वीकृत जागांचे गणित: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ निवडून आलेल्या नगरसेवकांच्या सभागृहात एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाते. नियमानुसार, प्रत्येक २३ निवडून आलेल्या नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक नियुक्त केला जातो.

eknath shinde
BMC Election 2026 | "आमचे नगरसेवक २४ कॅरेट सोनं...." : काँग्रेस नेत्‍या वर्षा गायकवाडांनी सत्ताधार्‍यांवर साधला निशाणा

सध्याच्या संख्याबळानुसार

भाजप: ४ जागा

शिंदे शिवसेना: १ जागा

ठाकरे शिवसेना: २ जागा (मनसेने पाठिंबा दिल्यास ३ जागा होण्याची शक्यता)

काँग्रेस: ३ जागा (अपक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून)

eknath shinde
Sanjay Raut On Fadnavis: फडणवीसांची पंतप्रधान पदाकडे पावले... मराठी माणूस म्हणून.... पत्रकार परिषदेत राऊत हे काय बोलून गेले

इच्छुकांची मोठी संख्या

शिंदे गटातील इच्छुकांची मांदियाळी आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला केवळ एक जागा येत असली तरी, इच्छुकांची यादी मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील नावांची चर्चा आहे:

१. राज प्रकाश सुर्वे: आमदार प्रकाश सुर्वे यांचे पुत्र. ते निवडणूक लढवण्यासही इच्छुक होते.

२. समाधान सरवणकर: माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता त्यांना स्वीकृत पदाची आशा आहे.

३. यशवंत जाधव: पक्षाचे ज्येष्ठ नेते.

४. दिलीप शिंदे

५. दीप्ती रवींद्र वायकर

६. प्रकाश पाटणकर

eknath shinde
Sanjay Raut : ‘ताज लँड’मध्ये आज जेवायला चाललोय, आमच्यावर संशय घेऊ नका : संजय राऊतांचे सूचक विधान

शिंदेंसमोर मोठं आव्हान

निवडणुकीच्या वेळी अनेकांना स्वीकृत पदाचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात जागा एकच असल्याने पक्ष कोणाला संधी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही यादी सहावर न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक मातब्बर नेते आणि त्यांचे पुत्र आता पक्षश्रेष्ठींकडे 'मनधरणी' करत आहेत.

ठाकरे गटाच्या बाबतीत, मनसेचा पाठिंबा मिळाल्यास त्यांच्या जागांचा आकडा वाढू शकतो, तर काँग्रेसला अपक्षांच्या मदतीने तीन जागा मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईच्या राजकारणात आता या १० जागांवर कोणाची वर्णी लागते, यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news