Bihar Election Results: आश्चर्यकारक! तेजस्वी यादवांच्या RJD ला भाजप अन् जदयूपेक्षा जास्त मतं

Tejashwi Yadav
Tejashwi Yadav pudhari photo
Published on
Updated on

Bihar Election Results:

बिहार विधनसभा निवडणुकीत भाजप अन् जनता दल युनायटेडनं घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. एकूण २४३ जागांच्या बिहार विधानसभेत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या आहेत. तर जनता दल युनायटेडनं ८५ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र जोरदार कॅम्पेन करून आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करून देखील राष्ट्रीय जनता दल अर्थात RJD ला मोठा सेटबॅक बसला आहे.

आरजेडीने यंदाच्या निवडणुकीत १४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील फक्त २५ जागांवर आरजेडीला विजय मिळवता आला आहे. २०१० नंतरची ही त्यांची सर्वात खराब कामगिरी आहे. २०१० मध्ये त्यांना फक्त २२ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

Tejashwi Yadav
PM Kisan Instalment: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसानचा 21 वा हप्ता कधी येणार? सरकारने जाहीर केली तारीख

जरी आरजेडीला जागा कमी मिळाल्या असल्या तरी यंदाच्या निवडणुकीत आरजेडीची मतं ही आश्चर्यकारकरित्या भाजप अन् जेडीयू पेक्षा जास्त आहेत.

यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील आरजेडीला २३ टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हा वेट शेअर भाजपपेक्षा २.९२ टक्क्यांनी तर जेडीयूपेक्षा ३.७५ टक्क्यांनी जास्त आहे. ही सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मात्र असं असलं तरी गेल्या निवडणुकीपेक्षा आरजेडीच्या वोट शेअरमध्ये थोडी घसरण झाली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी ही २३.११ इतकी होती. गेल्या निवडणुकीत त्यांना १४४ जागा लढवल्या होत्यात त्यातील त्यांनी ७५ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी १४१ जागांवर निवडणूक लढवली अन् त्यांना फक्त २५ जागांवरच विजय मिळवता आला आहे.

Tejashwi Yadav
Parbhani News : महिला पोलिसाची छेड; सहायक पोलिस उपनिरीक्षक निलंबित, पोलिस दलात खळबळ

तेजस्वी यादव यांनी राघोपूर विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. तो यादव कुटुंबियांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी एनडीएचे उमेदवार सतिश कुमार यांनी त्यांना कडवी झुंज दिली.

दुसरीकडं महागठबंधनमधील इतर सर्व पक्षांनी निराशाजनक कामगिरी केली. काँग्रेसला फक्त ६ जागा जिंकता आल्या आहेत. २०१० मध्ये काँग्रेसला फक्त ४ जागा जिंकता आल्या होत्या. दुसरीकडं सीपीआय (एमएल)एलनं २ जागा जिंकल्या असून सीपीआय(एम)ने एक जागा जिंकली आहे. महागठबंधननं एकूण फक्त ३५ जागांवरच विजय मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news