Ernakulam Express Train Accident: दोन रल्वे डब्यांना लागली आग... टाटानगर - एर्नाकुलम एक्सप्रेसच्या डब्यात होते १५८ प्रवासी

Ernakulam Express Train Accident
Ernakulam Express Train Accidentpudhari photo
Published on
Updated on

Ernakulam Express Train Accident: आंध्र प्रदेश येथील यालामांचिली इथे दोन रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली. टाटानगर- एर्नाकुलम एक्सप्रेसला आग लागल्याची माहिती घटनास्थळी पोहोचलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार त्यांना या अपघाताची अन् रेल्वेच्या कोचला आग लागल्याची माहिती रात्री उशिरा १२.४५ मिनिटांनी मिळाली.

Ernakulam Express Train Accident
Rajdhani Express Accident: राजधानी एक्सप्रेसने आठ हत्तींना उडवलं... रेल्वेचे इंजीनसह पाच डबे रूळावरून घसरले

पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले की, एका ट्रेनटच्या कोचमध्ये ८२ तर दुसऱ्या ट्रेनच्या कोचमधील ७६ प्रवासी असलेल्या दोन डब्यांना आग लागली आहे. दुर्दैवाने बी १ कोचमध्ये एक मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्तीचे नाव चंद्रशेखर सुंदरम असं आहे.

Ernakulam Express Train Accident
Nashik Spiritual Train Journey : नाशिकरोडहून नवी आध्यात्मिक रेल्वे यात्रा

दोन्ही ट्रेनचे जळालेले डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले आहेत. त्यानंतर ट्रेन एर्नाकुलमकडे रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्त डब्यातील प्रवाशांना त्यांच्या डेस्टिनेशनकडे पाठवण्यात आलं आहे. दोन फॉरेन्सिक टीम या डब्यांना आग का लागली याचा शोध घेत आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news