तामिळनाडूतील विषारी दारु प्रकरणी काँग्रेसचे मौन का ?

भाजप अध्‍यक्ष जेपी नड्डांचे काँग्रेस अध्‍यक्ष खर्गेंना पत्र
Tamil Nadu toxic liquor case
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तामिळनाडूतील विषारी दारू घोटाळ्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तामिळनाडूतील विषारी दारू घोटाळ्याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. नड्डा यांनी या प्रकरणी त्यांच्या पक्षाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

.. तर ५६ लोकांचे प्राण वाचले असते

नड्डा यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तामिळनाडूतील विषारी दारूची दुर्घटना पूर्णपणे मानवनिर्मित आहे. राज्‍यातील सत्ताधारी द्रमुक युती सरकार आणि अवैध दारू माफिया यांच्यात साखळी नसती तर कदाचित ५६ लोकांचे प्राण वाचू शकले असते. कल्लाकुरिचीच्या करुणापुरम गावातील चिता जाळण्याच्या भयानक चित्रांनी संपूर्ण देशाच्या विवेकाला धक्का बसला आहे."

सीबीआय चौकशीची मागणी करा

"करुणापुरममध्ये अनुसूचित जातींची मोठी लोकसंख्या आहे. त्‍यांना गरिबी आणि भेदभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मला आश्चर्य वाटते की एवढी मोठी आपत्ती आली असताना, तुमच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने मौन का पाळले?" काही मुद्द्यांवर आपल्याला पक्षाच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती समुदायाचे कल्याण आणि सुरक्षा हा असाच एक मुद्दा आहे, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. तसेच तामिळनाडूमधील द्रमुक-इंडिया आघाडी सरकारची सीबीआय चौकशी करण्याची आणि राज्याचे दारूबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्री एस मुथुसामी यांना त्यांच्या पदावरून त्वरित हटवण्याची विनंती करावे, असे आवााहनही त्‍यांनी या पत्रातून केले आहे.

तामिळनाडूतील लोक राहुल गांधींचा दुटप्पीपणा पाहत आहेत

विषारी दारु प्रकरणात बळी गेलेल्‍यांच्‍या कुटुंबांना पुरेसा आधार मिळावा यासाठी पीडितांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईची रक्कम योग्य पातळीवर वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली. आज तामिळनाडूतील लोक आणि संपूर्ण अनुसूचित जाती समुदाय काँग्रेस पक्ष, विशेषतः राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचा दुटप्पीपणा पाहत आहेत, असा टोलाही त्‍यांनी लगावला आहे.

या प्रश्नावर आवाज उठवण्याचे धैर्य तरी दाखवावे

राहुल गांधींचे संविधान आणि अनुसूचित जमाती /ओबीसी समाजाचे कल्याण आणि हक्क सुनिश्चित करण्याबद्दलचे सर्व प्रवचन अचानक थांबले आहे. कारवाई करण्याची वेळ आली आहे. पोकळ शब्द, खोटे वक्तृत्व आणि पोकळ आश्वासने द्रमुक-इंडिया आघाडी रकारकडून अनुसूचित जातीच्या पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणारा अन्याय संपणार नाही, असा आरोपही त्‍यांनी केला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मौन बाळगण्याऐवजी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी किंवा किमान या प्रश्नावर आवाज उठवण्याचे धैर्य तरी दाखवावे, असे आवाहन भाजप अध्‍यक्षांनी आपल्या पत्रातून खर्गे यांना केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news