

Tamil Nadu Accident |
तामिळनाडूमध्ये तंजावर-तिरुचिरापल्ली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. सेंगकीपट्टी पुलाजवळ सरकारी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला.
तंजावरच्या जिल्हाधिकारी प्रियंका बालसुब्रमण्यम यांनी या अपघाताची माहिती दिली. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.