

LPG Crisis Viral Offer सध्या देशात एलपीजी सिलिंडर मिळवताना जनतेच्या नाकीनऊ आले आहेत. इराण- अमेरिका इस्त्रायल युद्धाचा परिणाम म्हणून देशता इंधन तुटवडा तयार झाला आहे. सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट साठी लागणारे व्यावासयीक सिलिंडरचे वितरण बंद केले आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला असून. अनेक सिलिंडर मिळत नसल्याने रेस्टॉरंट बंद पडली आहेत देशभरात ही परिस्थिती झाली आहे. अनेक हॉटेलमालकांनी चुलीवर जेवण तयार करण्यास सुरवात केली आहे. आता यावर एक भन्नाट आयडीया एका रेस्टॉरंट मालकाने लढवली आहे. याने थेट ग्राहकांनाच सिलिंडरच्या बदल्यात बिर्याणीची ऑफर दिली आहे.
‘एक व्यावसाईक सिलींडर द्या महिनाभर बिर्याणी मोफत खा’
हे आहे तामिळनाडूतील होसूर शहरातील 'इरोड अम्मायी मेस' Erode Ammayi Mess या मेसचे मालक आहेत, सैय्यद मुनीर हे रेस्टॉरंट या उपाहारगृहाने या महिन्याच्या सुरुवातीला इन्स्टाग्रामवर एक अत्यंत अनोखी ऑफर दिली आहे. 'आम्हाला स्वयंपाकात मदत करा, आम्ही तुम्हाला जेवू घालू', असे त्यांनी इन्टावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. जर लोकांनी उपाहारगृहात एक 'व्यावसायिक एलपीजी सिलिंडर' (१९ किलोचा निळा सिलेंडर) आणून दिला, तर त्यांना महिनाभर मोफत बिर्याणी मिळेल, अशी जाहिरात त्यात करण्यात आली होती.
6 ग्राहकांनी आणून दिले सिलेंडर
या होसूरमधील उपहारगृहाची ऑफर ऐकून अनेक ग्राहकांनी याला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये याठिकाणी दररोज येणारे ग्राहकांचा समावेश आहे. सिलिंडरची किंमत आणि महिनाभराच्या बिर्याणीचा खर्च यांचा हिशोब करून ही ऑफर तयार करण्यात आली आहे. बिर्याणीसाठी हे उपहारगृह प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर होताच ती स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.द हिंदूच्या वृत्तानूसार 'इरोड अम्मायी मेस' हे नाव तामिळनाडूमध्ये घरगुती चवीच्या मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी ही पोस्ट करुन १५ दिवसांहून अधिक काळ लोटला असून, आतापर्यंत सहा जणांनी आपल्या घरून गॅस सिलेंडर आणून दिले आहेत.
तसेच या ऑफरमध्ये दोन सिलींडर दिल्यास दोनवेळची बिर्याणी मोफत मिळणार आहे. तसचे यामध्ये चिकन बिर्याणी व मटण बिर्याणी असे दोन ऑप्शनही दिले आहेत. सध्या सोशलमिडीयावर हा चर्चेच विषय ठरला आहे.