

Tamil Nadu Maternity Leave: तमिळनाडू सरकारने आपल्या राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना तिसऱ्या अपत्यासाठी तब्बल १ वर्षाची मॅटरनिटी रजा देण्यास मंजुरी दिली आहे. पहिल्या दोन अपत्यांसाठी देखील हाच निमय लागू असणार आहे.
सध्याच्या घडीला विवाहित सरकारी कर्मचाऱ्यांना दोन अपत्यांसाठी ३६५ दिवसांची मॅटरनिटी रजा मिळते. आता दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलांसाठी मॅटरनिटी रजा १२ आठवड्यांची होती. आता ३६५ दिवसांची मॅटरनिटी रजा मिळणार आहे. दरम्यान, याबाबतची माहिती राज्याचे मानव्य संसाधन मंत्री डी सार्थककुमार यांनी विधानसभेत दिली.
ते म्हणाले, 'सध्याच्या परिस्थितीत तमिळ नाडू सरकार हे कल्याणकारी सरकार आहे. त्यांचा भर हा सामाजिक कल्याण आणि महिलांच्या सक्षमीकरण्यावर आहे. त्यामुळे सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी तिसऱ्या अपत्यासाठी मॅटरनिटी रजा ही वाढवून ३६५ दिवस करण्यात आली आहे.
आधी मॅटरनिटी रजा ही ९० दिवसांची होती. ती २०११ मध्ये सहा महिन्याची करण्यात आली. त्यानंतर २०१६ मध्ये ती ९ महिन्यांची करण्यात आली आहे. मात्र जुलै २०२१ मध्ये ती वाढवून ३६५ दिवस करण्यात आली. हा मॅटरनिटी लिव्ह वाढवण्याचा निर्णय अण्णा द्रमुक आणि द्रमुकच्या सरकारांनी घेतला होता. नियामानुसार दोन किंवा दोनपेक्षा कमी अपत्यांसाठी सर्वसामान्य परिस्थितीत ३६५ दिवसांची रजा देण्यात येते.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयायाच्या निर्देशानंतर आणि राज्य सरकारच्या विधेयक सुधारणेनंतर राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्यांसाठी १२ आठवडे म्हणजे ८४ दिवस पूर्ण पगारी रजा मिळणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची विस्तृत सरकारी आदेश जारी करण्यात येईल. या नियमाची अंमलबजावणी निर्णय सभागृहात जाहीर झाल्यापासून करण्यात येणार आहे.