Vijay TVK gov First Budget: थलपती विजय सरकारनं Gen Z साठी उघडला खजिना; महिलांसाठी देखील 'सोनेरी' गिफ्ट, गोंधळात बजेट सादर

Vijay TVK gov First Budget
Vijay TVK gov First Budgetpudhari
Published on
Updated on

Vijay TVK gov First Budget: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांची आपल्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी जेन झींसाठी आपल्या खजिना खोलल्याचं दिसून आलं. विजय यांनी आपल्या बजेटमध्ये युवक आणि महिलांसोबतच मुस्लिम समाजाला देखील चांगले वेटेज दिले आहे.

विजय यांच्या नेतृत्वातील सरकारने विधानसभेत गोंधळात आपलं पहिलं बजेट सादर केलं. यावेळी मुख्यमंत्री विजय आणि विरोधीपक्ष नेते उदयनिधी स्टॅलीन हे देखील सभागृहात उपस्थित आहोते. मंगळवारी उदयनिधी स्टॅलीन यांना अटक आणि सुटका झाली होती. त्यानंतर तामिळनाडूचे राजकारण चांगलंच तापलं होतं.

Vijay TVK gov First Budget
Vijay TVK NEET: नीट परीक्षाच रद्द करा; वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण अधिकार राज्यांना द्या, थलपती विजय यांची मागणी

दरम्यान, गोंधळातच राज्याचे अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी टीव्हीके सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वात जास्त भर हा युवक, विद्यार्थी आणि महिलांकवर होता. विजय सरकारने १० लाख कोटी रूपयांचे कर्जातून बाहेर काढण्याचा दावा केला आहे. तसेच महिला आणि तरूणांसाठी ऐतिहासिक कल्याणकारी योजनांची घोषणा केली.

Vijay TVK gov First Budget
Vijay TVK government formation | तामिळनाडूमध्ये विजय यांनी गाठली 'मॅजिक फिगर'; vckच्या पाठिंब्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

बजेटमध्ये Gen Z साठी काय?

तरूण आणि विद्यार्थ्यांसाठी टीव्हीके सरकारने आपल्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या. वेत्री मणिकणिनि थिट्टम अंतर्गत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिला जाईल. यासाठी बजेटमध्ये २००० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकल देण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी बजेटमध्ये २२७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली.

तसेच ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी माजी मुख्यमंत्री कामराज यांच्या नावावर सरकारी निवासी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी १२५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Vijay TVK gov First Budget
TVK Vijay Government| तमिळनाडूतील 'सत्तानाट्यात' नवा ट्विस्ट, 'टीव्हीके'ला पाठिंबा देण्‍यासाठी AIADMK मध्ये बंडाचे वारे!

तसेच शाळांचे आधुनिकीकरण देखील केलं जाणार आहे. पल्ली निरावु थिट्टम योजनेअंतर्गत सरकारी शाळांच्या आधुनिकीकरणासाटी ३०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तरूणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Vijay TVK gov First Budget
TVK Vijay Government| तमिळनाडूतील 'सत्तानाट्यात' नवा ट्विस्ट, 'टीव्हीके'ला पाठिंबा देण्‍यासाठी AIADMK मध्ये बंडाचे वारे!

महिलांना सोनेरी गिफ्ट

अर्थसंकल्पात टीव्हीकेच्या सरकारने निवडणुकीत केलेली आपली घोषणा पूर्ण करताना महिलांना आणि नवजात मुलांसाठी १३०० कोटी रूपयांपेक्षा जास्त गोल्ड असिस्टंट योजनेची घोषणा केली. लग्नावेळी महिला लाभार्थीला ८ ग्रॅम सोन्याचे नाणे आणि एक सिल्क साडी देण्याची योजाना मंजूर करण्यात आली आहे. तसेच सरकारी रूग्णालयात जन्म घेतलेल्या प्रत्येक नवजात मुलाला सोन्याची अंगठी देण्याच्या योजनेसाठी ५६० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news