तामिळनाडू : टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग

Tata Plant Fire : आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही
Tamilnadu News
तामिळनाडू : टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आगPudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू मधील टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोदामात आज (दि.२८)  सकाळी  आग लागली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीची माहिती मिळताच होसूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील एकुण सात अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. (Tata Plant Fire)

कर्मचारी सुरक्षित

होसूरच्या वरिष्ठ अग्निशमन आणि बचाव सेवेच्या अधिका-यांनी सांगितले,  सकाळी सहाच्या सुमारासटाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या केमिकल गोदामात आग लागली. अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने  सांगितले कर्मचारी सुरक्षित आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.  

टाटा कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "तामिळनाडूतील होसूर येथे असलेल्या आमच्या गोदाममध्ये आगीची दुर्दैवी घटना घडली.  आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. ते तपासले जात आहे. आम्ही आमचे कर्मचारी आणि इतर भागधारक यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news