

चैन्नई ; पुढारी ऑनलाईन तमिळनाडूच्या शिवगंगा मध्ये (82 वर्षीय) मुथु यांनी त्यांच्या पाळीव कुत्रा टॉम च्या स्मरणार्थ शेतात एक मंदिर उभारले आहे. मुथु गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्या पाळीव कुत्रा टॉम सोबत राहात आहेत. गेल्या वर्षी आजारपणात टॉमचा मृत्यू झाला होता.
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओ…
मुथु यांनी आपल्या लाडका (कुत्रा) टॉमच्या स्मरणार्थ बांधलेले मंदिर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लोक या वृद्धाचे कौतुक करत आहेत. अनेकांनी पाळीव प्राण्यांवर इतक प्रेम खूप कमी बघायला मिळतं अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी माणसावरही लोकांचं इतक प्रेम नसतं जितक मुथु यांचं या कुत्र्यावर होतं. या वृद्ध मुथु यांच्या मते टॉम त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. तो एक प्रशिक्षित कुत्रा होता.
मुथु स्व्:तहा या मंदिराची रोजच्या रोज न चुकत स्वच्छता करतात. या ठिकाणी (कुत्रा) टॉम च्या गळ्यात पुष्पहार घालून त्याची यथासांग पुजा केली जाते. त्याला फळे, केळींचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबतच त्याची धुपारती करून त्याला नारळ ही वाढवला जातो.