Blast
तामिळनाडू | फटाकांच्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू File Photo

तामिळनाडू : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; दोघे ठार

चारजण गंभीर जखमी
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथे खाजगी फटाकांच्या कारखान्यात स्फोट झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सथानकुलम शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; दोघे ठार

माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी येथील शनिवारी (दि.३१) संध्याकाळी  एका  खाजगी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. यात दोघांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. मुथुकन्नन (वय २१) आणि विजय (वाय २३) अशी मृतांची नावे आहेत. तर सेल्वम (21), प्रशांत (20), सेंधुरकणी (45), मुथुमारी (41) हे इतर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सथानकुलम शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ३ लाख मदत जाहीर

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या स्फोटात मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news