

Tamilnadu CM Vijay Controversy: तमिळ नाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय सध्या उच्च न्यायालयात एक मोठ्या प्रकरणाचा सामना करत आहेत. हे प्रकरण त्यांच्या निवडणूक प्रचारासंदर्भातील असून ते खूप गंभीर प्रकरण आहे. सी जोसेफ विजय यांच्यावर आरोप आहे की त्यांनी निवडणूक प्रचारावेळी मुलांचा वापर केला. याबाबत त्यांच्या प्रतिस्पर्ध्याने याचिका दाखल केली आहे. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे.
गुरूवारी विजय यांनी मद्रास उच्च न्यायालयात निवडणूक प्रचारात मुलांचा वापर केला या एका गोष्टीसाठी त्यांचा निवडणुकीतील विजय रद्द करण्यात येऊ नये असं म्हणणं माडलं आहे. विजय यांनी हा युक्तीवाद तिरूचिरापल्ली ईस्ट विधानसभा सीटविरूद्ध दाखल निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेवच्या सुनावणीवेळी करण्यात आलाल. विजय यांनी विधानसभा निवडणुकीत डीएमके उमेदवार एस. इनिगो इरूदयराज यांचा २७ हजार ४१६ मतांनी पराभव केला होता.
इरुदयराज यांनी विजयच्या निवडणूक विजयाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. जर विजय यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना आपली आमदारकी गमवावी लागू शकते. जर आमदारकी गेली तर सीएम पद देखील रहाणार नाही. उच्च न्यायालयाने याबाबत अजून कोणता निर्णय दिलेला नाही. मात्र सी जोसेफ विजय यांच्यावर टांगती तलवार नक्कीच आहे.
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार इरूदयराज यांनी आपल्या निवडणुक याचिकेत आरोप केला आहे की विजय आणि सत्ताधारी पत्र तमिलगा वेत्री कझगम अर्थात टीव्हीकेच्या लोकांनी निवडणूक प्रचारात मुलांचा वापर केला होता. या याचिका निवडणूक आयोगच्या ५ फेब्रुवारी २०२४ च्या गाईडलाईनचा आधार घेण्यात आला आहे. त्यात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराला निवडणूक संदर्भातील घडामोडीत मुलांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.