Supreme Court : घटस्फोटानंतर पतीची जबाबदारी संपत नाही

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
Supreme Court divorce judgment
Supreme Court : घटस्फोटानंतर पतीची जबाबदारी संपत नाही Pudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली ः पत्नी शिक्षित आहे किंवा तिला पालकांचा पाठिंबा आहे या सबबीवर घटस्फोटानंतरही पती आपल्या माजी पत्नीला सांभाळण्याच्या कर्तव्यापासून पळ काढू शकत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

“आपल्या समाजात विवाह ही एक संस्था म्हणून भावनिक बंध, सहवास आणि परस्पर पाठिंब्यावर आधारलेली आहे. तिचे मूल्य केवळ पैशात करता येत नाही. स्थिर आणि सन्माननीय जीवन जगण्याच्या कायदेशीर अपेक्षेसह एक स्त्री विवाह करते. जेव्हा असा विवाह तुटतो तेव्हा पत्नीला सन्मानाने जगता यावे यासाठी केवळ ती शिक्षित आहे किंवा तिच्या पालकांचा पाठिंबा आहे या कारणास्तव पतीचे कर्तव्य संपत नाही. ती पतीबरोबर असताना ज्या दर्जाचे जीवन जगते तसेच जीवन जगण्याचा अधिकार तिला घटस्फोटानंतरही आहे, असे मत न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने व्यक्त केलेे.

Supreme Court divorce judgment
Foreign birds migration : विदेशी पक्ष्यांची नवजननी कोकण किनारपट्टी

तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेली संबंधित महिलेची याचिकाही मंजूर केली. कुटुंब न्यायालयाने ठरवलेल्या दरमहा केवळ 15,000 रुपये पोटगी देण्याच्या निर्णयाविरुद्ध तिची याचिका विचारात घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. पोटगी वाढवून देण्याची मागणी तिने केली होती.

Supreme Court divorce judgment
CM Devendra Fadnavis : कोंडीची चौकशी करून अहवाल सादर करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news