Supreme Court : गृहिणी म्‍हणजे 'राष्ट्रनिर्माता'; योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Supreme Court Judgment On Homemakers : मोटार अपघात दावे जलद गतीने निकाली काढण्याचे निर्देश
Supreme Court : गृहिणी म्‍हणजे 'राष्ट्रनिर्माता';  योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Published on
Updated on

Supreme Court Judgment On Homemakers : कुटुंबात गृहिणीचे योगदान केवळ घरापुरते मर्यादित नसून राष्ट्र उभारणीत ती मोलाची भूमिका बजावते. अपघातात गृहिणीचा मृत्यू किंवा ती दिव्यांग झाल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicles Act) मोटार अपघात दाव्यांमध्ये गृहिणीने (Homemaker) दिलेल्या कौटुंबिक काळजीचे नुकसान हा भरपाईचा एक स्वतंत्र आणि महत्त्वाचा भाग मानला जावा, असे स्‍पष्‍ट करत सर्वोच्‍च न्‍यायालयाने गृहिणीच्या या कौटुंबिक सेवांचे मूल्य किमान ३०,००० रुपये प्रति महिना निश्चित केले आहे.

मोटार अपघात विमा दाव्याच्या अपीलावर निकाल

एका मोटार अपघात विमा दाव्याच्या अपीलावर निकाल देताना न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. निकाल सुनावताना न्यायमूर्ती करोल म्हणाले, "आमचे असे मत आहे, की गृहिणी ही राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देते. गृहिणी राष्ट्र उभारणीचे काम करते. म्हणूनच राष्ट्रनिर्मात्या म्हणून गृहिणीच्या कौटुंबिक काळजीच्या नुकसानाचे मूल्य कोणत्याही परिस्थितीत किमान ३०,००० रुपये प्रति महिना असावे, असे आम्ही निश्चित केले आहे."

Supreme Court : गृहिणी म्‍हणजे 'राष्ट्रनिर्माता';  योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme court | वडिलांच्या संपत्तीवरील मुलींच्‍या हक्कांना २००५ मधील कायद्यातील सुधारणेमुळे धक्का नाही : सर्वोच्‍च न्‍यायालय

गृहिणी या शब्दाला आता 'राष्ट्रनिर्माता' म्हणून ओळखले जाईल

मोटार अपघात दाव्यांमध्ये भरपाई देताना सर्वोच्च न्यायालयाच्या 'प्रणय सेठी' प्रकरणातील निकालात नमूद केलेल्या निकषांव्यतिरिक्त 'कौटुंबिक काळजीचे नुकसान' हा एक अतिरिक्त आधार मानला जाईल, असे स्‍पष्‍ट करत आम्हाला आशा आणि विश्वास आहे की, 'होम मेकर' (गृहिणी) या शब्दाला आता 'राष्ट्रनिर्माता' (Nation Builder) म्हणून ओळखले जाईल," असेही न्यायमूर्ती करोल यांनी नमूद केले.

Supreme Court : गृहिणी म्‍हणजे 'राष्ट्रनिर्माता';  योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court | लग्नानंतर मुलीचे माहेरशी नाते तुटत नाही! 'ती' रूढीवादी मानसिकता राज्यघटनेशी विसंगत; सर्वोच्च न्यायालयाची चपराक

यापूर्वीच्‍या निर्णयात काय म्‍हणाले होते सर्वोच्‍च न्‍यायालय?

यापूर्वी २०२४ मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयातही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, 'गृहिणी काम करत नाहीत' हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. गृहिणीचे अंदाजित उत्पन्न हे रोजंदारीवरील मजुरासाठी अधिसूचित केलेल्या किमान वेतनापेक्षा कमी नसावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता.

Supreme Court : गृहिणी म्‍हणजे 'राष्ट्रनिर्माता';  योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३०,००० रुपये : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Supreme Court on dowry death | मुले लग्नानंतर पत्नी, तिच्या कुटुंबाचा छळ का करतात? हुंडाबळी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सवाल

मोटार अपघात दावे जलद गतीने निकाली काढण्याचे निर्देश

न्यायालयाने मोटार अपघात भरपाईचे दावे जलद गतीने निकाली काढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देशही सर्वोच्‍च न्‍यायालयाने जारी केले आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणांसमोर संक्षिप्त प्रक्रियेची तरतूद करणाऱ्या 'मोटार वाहन कायद्या'च्या कलम १६९ चा हवाला देत खंडपीठाने आशा व्यक्त केली की, या तरतुदीची पूर्णपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल.तसेच, सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींनी मोटार अपघात दाव्यांच्या सुनावणीवर लक्ष ठेवावे, जेणेकरून वेळेत न्याय मिळेल आणि या निकालात निश्चित केलेल्या तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news