Pawan Khera Bail | काँग्रेस नेते पवन खेडा यांना अटी शर्तींसह अटकपूर्व जामीन

कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यासही खेडा यांना मनाई
Pawan Khera Bail
Pawan Khera BailPudhari
Published on
Updated on

Himanta Biswa Sarma wife defamation case

नवी दिल्ली : काँग्रेस नेते पवन खेड़ा यांना सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.१) हा निकाल जाहीर करण्यात आला.

न्यायालयाने खेड़ा यांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी बोलावल्यास त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहणे बंधनकारक असेल. तसेच कोणत्याही प्रकारे पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे.

Pawan Khera Bail
Raid On Pawan Khera: काँग्रेस प्रवक्ते पवन खेरांच्या दिल्लीतील घरावर छापा... सरमांच्या पत्नीनं FIR करताच आसाम पोलीस अॅक्टिव्ह

हे प्रकरण हिमंत बिस्वा सरमा यांच्या पत्नीबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांशी संबंधित आहे. या संदर्भात असममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेड़ा यांच्या बाजूने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अटकेची गरज नसल्याचा युक्तिवाद केला, तर सरकारकडून कोठडीतील चौकशीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, यापूर्वी गुवाहाटी उच्च न्यायालयाने खेड़ा यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील सुनावणीदरम्यान आवश्यक असल्यास न्यायालय अतिरिक्त अटी लागू करू शकते, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news