

पुढारी ऑनलाईन डेस्क: पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून याचिकेवर आज (दि.१०) सुनावणी घेतली. दरम्यान न्यायालयाने या घटनेतील खटल्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टास्क फोर्सला (NTF) १२ आठवड्यांच्या आत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुढे सर्वोच्च न्यायालयाने आता आपण केंद्रीय कायदा वगैरे विषय हाताळू शकत नाही. पण या खटल्यातील स्टेप बाय स्टेप जायचं आहे, असे स्पष्ट केले. न्यायालयासमोर या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाला अपडेट देताना वकील वृंदा ग्रोव्हर यांनी म्हटले आहे की, खटला चालू आहे आणि CBI पुढील आठवड्यात खटला पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. तसेच आरजी कार मेडिकल कॉलेज डॉक्टर बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पुढील सुनावणी 17 मार्च 2025 रोजी घेणार असल्याचे देखील आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.