Sunjay Kapur Estate Raw :
प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचं पोलो खेळताना निधन झालं होतं. आता त्यांच्या संपत्तीचा वाद कोर्टात पोहचला आहे. संजय कपूर यांची घटस्फोटीत पत्नी करिष्मा कपूर हिच्या मुलांनी दिल्ली उच्च न्यायायलात संपत्तीत हिस्सा मिळावा यासाठी दावा दाखल केला आहे. याला आता संजय कपूर यांची विधवा पत्नी प्रिया कपूर ही उच्चर देत आहे. संजय कपूर यांची एकूण संपत्ती जवळपास ३० हजार कोटी रूपये इतकी आहे. दरम्यान, बुधवारी प्रिया कपूरनं तिच्या सावत्र मुलीच्या याचिकेला आव्हान दिलं.
करिष्मा कपूरच्या मुलीनं केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी प्रिया कपूर यांच्या वतीनं अॅडव्होकेट राजीव नायर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात हजेरी लावली. त्यांनी ही याचिका काही पोटगीची याचिका नाही असं सांगितलं. यावेळी झालेल्या युक्तीवादावेळी प्रियाचे वकील तिच्या वतीने म्हणाले की, 'मी संजय कपूर यांची कायदेशीर बायको होते. तुम्ही जो प्रेमाचा आणि आत्मियतेचा दावा करताय तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या घटस्फोट प्रकरणावेळी कुठं गेला होता. तुला तुझ्या पतीनं बऱ्याच वर्षापूर्वी सोडून दिलं होतं.' करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांचा २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता.
प्रिया कपूरचे वकील पुढे म्हणाले, 'ज्यांनी ही याचिका केली आहे त्यांनी त्यांच्या पालकांना सांगावं की पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबतचा घटस्फोटाचा खटला हा सर्वोच्च न्यायालयात संपुष्टात आला आहे. त्याचबरोबर कथित प्रेम देखील संपुष्टात आलं आहे. एका पुरूषाचा मृत्यू झाला आहे. थोडी तरी सहानुभूती दाखवा. मी त्यांची विधवा पत्नी आहे. मी त्यांची कायदेशीर लग्नाची पत्नी आहे. तुमच्या बाबतीत बोलायच झालं तर तुला तुझ्या नवऱ्यानं खूप वर्षापूर्वीच सोडून दिलं होतं.'