छत्तीसगडमध्ये मोठी चकमक; १६ नक्षलवादी ठार

Chhattisgarh Naxal encounter | सुकमा जंगलात सुरक्षा दलाची मोठी कारवाई
Naxalites Encounter
Chhattisgarh Naxalites Encounter | महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर मोठी चकमक; ३१ नक्षलवादी ठार AI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chhattisgarh Naxal encounter | छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात आज (दि. २९) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. आतापर्यंत या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले, ही संख्या वाढू शकते. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, केरळपाल पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली. केरळपाल परिसरात माओवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे कर्मचारी सहभागी आहेत.

दुसरीकडे, याआधी सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले होते की, सुकमा-दंतेवाडा सीमेवरील उपमपल्ली केरळपाल भागातील जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५ नक्षलवादी ठार झाले. ही चकमक अजूनही सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news