Sudden death and COVID vaccine | कमी वयात अचानक होणारे मृत्यू कोविड प्रतिबंधक लसीमुळे? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा...

Sudden death and COVID vaccine | AIIMS व ICMR च्या शास्त्रीय अभ्यासाचे निष्कर्ष आले समोर...
covid 19 | vaccine
covid 19 | vaccinePudhari
Published on
Updated on

Sudden death and COVID vaccine ICMR, AIIMS COVID vaccine study Ministry of Health COVID statement

नवी दिल्ली: देशात कोविड महारोगराईच्या नंतरच्या काळात घडणाऱ्या काही अचानक मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, कोविड-19 लसीकरणाशी याचा काही संबंध आहे का, याबाबत अनेक अफवा आणि संभ्रम निर्माण झाला होता.

विशेषतः 18-45 या वगोटातील अनेक तरुणांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. याबाबत देशभरातून चिंता व्यक्त होत होती.

याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता स्पष्टीकरण दिले आहे. मंत्रालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) या देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांनी यासंदर्भात केलेल्या अभ्यासांतून समोर आलेल्या निष्कर्षांवरून महत्वाची माहिती दिली आहे.

covid 19 | vaccine
Tesla Driverless Delivery | इलॉन मस्कचा चमत्कार! टेस्लाची पहिली ड्रायव्हरलेस कार थेट पोहोचली ग्राहकाच्या घरी; व्हिडिओ व्हायरल

ICMR च्या अभ्यासातील निष्कर्ष

ICMR – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी (NIE) यांच्याकडून “Factors associated with unexplained sudden deaths among adults aged 18-45 years in India” या नावाने एक बहुस्थळी प्रकरण-नियंत्रण (case-control) अभ्यास मे ते ऑगस्ट 2023 या काळात देशभरातील 19 राज्यांतील 47 तृतीय स्तरीय रुग्णालयांमध्ये करण्यात आला.

या अभ्यासामध्ये ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान निरोगी दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये झालेल्या अचानक मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, कोविड लस घेणाऱ्यांमध्ये अशा मृत्यूंचा धोका वाढलेला नाही.

covid 19 | vaccine
Indian ice creams in TasteAtlas | भारतातील 'हे' आईस्क्रीम जगात 7 व्या स्थानी; टॉप 100 मध्ये 5 देशी आईस्क्रीम्स, मुंबईच्या 2 फ्लेवर्सना जागतिक मान्यता

AIIMS च्या अहवालात काय म्हटले आहे

दुसरा अभ्यास AIIMS, नवी दिल्ली येथे सध्या सुरू असून, ICMRच्या सहकार्याने केला जात आहे. "Establishing the cause in sudden unexplained deaths in young" या नावाचा हा अभ्यास सध्या प्रगतीपथावर आहे.

आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका (Myocardial Infarction) हेच प्रमुख कारण म्हणून पुढे येत आहे. याशिवाय, अनेक प्रकरणांमध्ये आनुवंशिक दोष (genetic mutations) हे संभाव्य कारण ठरत असल्याचे समोर येत आहे.

लसीबद्दल अपप्रचार करणे धोकादायक

वैज्ञानिक तज्ज्ञांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, कोविड लसीकरणामुळे अचानक मृत्यू होत असल्याचा दावा पूर्णतः खोटा व दिशाभूल करणारा आहे.

अशा अपप्रचारामुळे जनतेमध्ये लसीबाबत भीती निर्माण होऊन लस न घेण्याचा धोका वाढू शकतो, ज्याचा थेट परिणाम देशाच्या सार्वजनिक आरोग्यावर होऊ शकतो.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, लसीकरणामुळे निर्माण होणारे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत आणि बहुतेक प्रकरणांमध्ये अचानक मृत्यूमागे असलेली कारणे ही वैयक्तिक आरोग्यस्थिती, अनुवंशिकता, जीवनशैली व कोविड संसर्गानंतरचे गुंतागुंत यांशी संबंधित आहेत.

covid 19 | vaccine
US Embassy India visa rules | अमेरिकेचा व्हिसा हवायं? मग मागील 5 वर्षांतील तुमचे फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर तपासले जाणार...

सरकारचा भर वैज्ञानिक संशोधनावर

केंद्र सरकार आपल्या नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पुराव्यांवर आधारित सार्वजनिक आरोग्य धोरणे आखत आहे. कोविड लस हा एक महत्त्वाचा आरोग्य उपाय असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news