Tesla Driverless Delivery | इलॉन मस्कचा चमत्कार! टेस्लाची पहिली ड्रायव्हरलेस कार थेट पोहोचली ग्राहकाच्या घरी; व्हिडिओ व्हायरल

Tesla Driverless Delivery | डिलिव्हरी 30 मिनिटांत पूर्ण : कार स्वतःच चालली; सिग्नल पाळले, स्वतःच पार्कही झाली!
Tesla first Driverless car Delivery
Tesla first Driverless car Delivery
Published on
Updated on

Tesla First Driverless EV Car Delivery Model Y Elon Musk Kapow Tesla Without Driver Driverless Car Real Video

टेक्सास (अमेरिका) : अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी टेस्लाने इतिहास रचला आहे. कंपनीने आपल्या Model Y या कारद्वारे पहिली पूर्णपणे स्वयंचलित (फुल्ली ऑटोनॉमस) कार डिलिव्हरी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. या प्रवासात कारमध्ये ना चालक होता, ना कुठलाही रिमोट कंट्रोल ऑपरेटर. ही कार एकटीनेच ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचली.

कारने कोणताही मानवी हस्तक्षेप न करता प्रवास केला

ही डिलिव्हरी टेक्सासमधील गिगाफॅक्टरीमधून सुरू झाली आणि अवघ्या ३० मिनिटांत कारने ग्राहकाच्या घरापर्यंतचा प्रवास केला. यामध्ये हायवे, शहरातील रस्ते, सिग्नल, स्टॉप साईन्स अशा अनेक अडथळ्यांचा कारने अत्यंत कुशलतेने सामना केला. अखेरीस, कार स्वतःहून ग्राहकाच्या इमारतीखाली जाऊन पार्क झाली.

Tesla first Driverless car Delivery
Indian ice creams in TasteAtlas | भारतातील 'हे' आईस्क्रीम जगात 7 व्या स्थानी; टॉप 100 मध्ये 5 देशी आईस्क्रीम्स, मुंबईच्या 2 फ्लेवर्सना जागतिक मान्यता

इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया: “Kapow!”

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी या ऐतिहासिक क्षणाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी या यशाला एकाच शब्दात "Kapow!" असे संबोधले आहे. त्यांच्या मते, ही डिलिव्हरी एक दिवस आधीच पूर्ण करण्यात आली.

टेस्लाने आधी टीझर नंतर व्हिडिओ केला शेअर

टेस्लाने याबाबत एक 3 मिनिटांचा टाईम-लॅप्स टीझर आणि नंतर संपूर्ण 30 मिनिटांचा प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मागील सीटवरून शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये, Model Y कारने कशा प्रकारे स्वतःहून रस्ता पार केला, सिग्नल पाळले आणि ट्रॅफिकमध्ये निर्णय घेतले, हे स्पष्ट दिसून येते.

Tesla first Driverless car Delivery
Warren Buffett $6 billion donation | वॉरेन बफे यांनी दान केले तब्बल 6 अब्ज डॉलर्सचे शेअर; 'या' 5 संस्थांना घसघशीत देणगी

टॉप स्पीड 116 किलोमीटर प्रतितास

टेस्लाचे AI आणि ऑटोपायलट विभागाचे प्रमुख अशोक एलुस्वामी यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान कारचा कमाल वेग 72 मैल प्रति तास (सुमारे 116 किमी/ताशी) होता.

Tesla first Driverless car Delivery
Tesla Mumbai showroom | टेस्ला पुढील महिन्यात पहिलं शोरूम मुंबईत उघडणार; किंमत, मॉडेल... जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

रोबोटॅक्सी सेवेचीही सुरूवात

याच आठवड्यात टेस्लाने ऑस्टिन शहरात ड्रायव्हरलेस रोबोटॅक्सी सेवा देखील सुरू केली. सुरुवातीला ही सेवा काही निवडक गुंतवणूकदार आणि एन्फ्लुएन्सर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आली. इलॉन मस्क यांनी याआधीच याबाबत संकेत दिले होते की, भविष्यात लाखो रोबोटॅक्सी रस्त्यावर असतील.

भविष्यातील तंत्रज्ञानाची चुणूक

ही डिलिव्हरी केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे तर वाहतूक आणि लॉजिस्टिक्सच्या भविष्यासाठीही मैलाचा दगड मानली जात आहे. भविष्यात या तंत्रज्ञानाची कक्षा केवढी विस्तारेल याची ही झलक होती, असे तज्ज्ञांचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news