Rahul vs Swamy : ‘राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द करा’, सुब्रमण्यम स्वामींची दिल्ली हायकोर्टात याचिका

राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा
Rahul Gandhi Subramanian Swamy
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Rahul Gandhi's Indian citizenship : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयाकडे केली आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा त्यांनी तेव्हाही केला होता. तर केंद्र सरकारने २० एप्रिल २०१९ रोजी राहुल गांधींना "नागरिकत्वाशी संबंधित तक्रार" या विषयावर नोटीस पाठवली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news