

मुंबई : नवीन वर्ष २०२६ मध्ये भारतीय शेअर बाजार (Stock Market) किती दिवस बंद राहणार, याची प्रतीक्षा आता संपली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने पुढील वर्षासाठी ट्रेडिंग हॉलिडेची अधिकृत यादी (Holiday List) जाहीर केली आहे. या घोषणेनुसार, २०२६ मध्ये राष्ट्रीय सण आणि प्रमुख सण-उत्सवांच्या निमित्ताने एकूण १५ दिवस शेअर बाजाराचे कामकाज पूर्णपणे थांबलेले असेल.
गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्या ट्रेडिंग धोरणांवर या सुट्ट्यांचा थेट परिणाम होत असल्याने, या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते.
ट्रेडर्ससाठी या यादीत एक खास आकर्षण आहे. जाहीर झालेल्या १५ सुट्ट्यांपैकी तब्बल ५ सुट्ट्या शुक्रवारी येत आहेत. यामुळे सलग शनिवार आणि रविवार जोडून एक लांबलचक वीकेंड ट्रेडर्सना मिळणार आहे. या काळात गुंतवणुकीचा अभ्यास करण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी चांगला वेळ मिळू शकेल.
NSE ने दिलेल्या माहितीनुसार, २०२६ मध्ये कोणत्या महिन्यात किती दिवस बाजार बंद राहील, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
जानेवारी : १ दिवस
फेब्रुवारी : ० दिवस
मार्च : २ दिवस
एप्रिल : २ दिवस
मे : २ दिवस
जून : १ दिवस
जुलै आणि ऑगस्ट: ० दिवस
सप्टेंबर : १ दिवस
ऑक्टोबर : २ दिवस
नोव्हेंबर : २ दिवस
डिसेंबर : १ दिवस
अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे आणि योगायोगाने तो दिवस रविवार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, अर्थसंकल्पाच्या दिवशी शनिवार किंवा रविवार असला तरी बाजार उघडा ठेवण्याची परंपरा आहे. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणांवर त्वरित प्रतिक्रिया नोंदवता यावी. त्यामुळे १ फेब्रुवारी २०२६ रोजी शेअर बाजार सुरू राहण्याची पूर्ण शक्यता आहे.
२६ जानेवारी, २०२६ : सोमवार : प्रजासत्ताक दिन
३ मार्च, २०२६ : मंगळवार : होळी
२६ मार्च, २०२६ : गुरुवार : श्री राम नवमी
३१ मार्च, २०२६ : मंगळवार : श्री महावीर जयंती
३ एप्रिल, २०२६ : शुक्रवार : गुड फ्रायडे
१४ एप्रिल, २०२६ : मंगळवार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१ मे, २०२६ : शुक्रवार : महाराष्ट्र दिन
२८ मे, २०२६ : गुरुवार : बकरी ईद
२६ जून, २०२६ : शुक्रवार : मोहरम
१४ सप्टेंबर, २०२६ : सोमवार : गणेश चतुर्थी
२ ऑक्टोबर, २०२६ : शुक्रवार : महात्मा गांधी जयंती
२० ऑक्टोबर, २०२६ : मंगळवार : दसरा
१० नोव्हेंबर, २०२६ : मंगळवार : दिवाळी - बलिप्रतिपदा
२४ नोव्हेंबर, २०२६ : मंगळवार : श्री गुरु नानक जयंती
२५ डिसेंबर, २०२६ : शुक्रवार : ख्रिसमस