Narendra Modi Croatia Visit | क्रोएशियाकडून पंतप्रधान मोदींना खास गिफ्ट; जगातील पहिला लॅटिनमधील संस्कृत व्याकरण ग्रंथ दिला भेट...

Narendra Modi Croatia Visit | पंतप्रधान मोदींकडून क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिले ‘पटचित्र’
Narendra Modi recieve gift in Croatia Visit
Narendra Modi recieve gift in Croatia Visitx
Published on
Updated on

Narendra Modi Croatia Visit Gift First Sanskrit Grammar in Latin Book Cultural Exchange Pattachitra Gift

झाग्रेब (क्रोएशिया) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक क्रोएशिया दौर्‍यादरम्यान, क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेंकोविच यांनी एक अत्यंत खास आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली भेट दिली. त्यांनी पंतप्रधान मोदींना क्रोएशियन वैज्ञानिक आणि मिशनरी फिलिप वेझ्डिन यांनी लिहिलेल्या 'संस्कृत व्याकरण' या ग्रंथाची 1790 मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या लॅटिन भाषेतील पुनर्मुद्रित प्रत सप्रेम भेट दिली.

हा ग्रंथ भारत आणि क्रोएशिया यांच्यातील ऐतिहासिक बौद्धिक आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जात आहे. फिलिप वेझ्डिन (1748-1806) हे पहिले युरोपीय विद्वान होते ज्यांनी भारतातील भाषाशास्त्र आणि संस्कृतीवर सखोल अभ्यास केला. त्यांनी केरळमधील स्थानिक हस्तलिखितांवर आधारित हा ग्रंथ तयार केला होता.

दोन्ही पंतप्रधानांचे ट्विट...

पंतप्रधान प्लेंकोविच यांनी सोशल मीडियावर लिहिले, "हा ग्रंथ भारत-क्रोएशिया यांच्यातील ऐतिहासिक सहकार्याचे प्रतीक आहे. आम्हाला अभिमान आहे की वेझ्डिन यांनी भारतात राहून केलेला अभ्यास आजही दोन्ही देशांच्या मैत्रीचे द्योतक ठरतो."

पंतप्रधान मोदींनीही 'X' वर प्रतिक्रिया देताना लिहिले, "पंतप्रधान प्लेंकोविच, या अनमोल भेटीसाठी आपले मन:पूर्वक आभार. हे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील दीर्घकालीन बौद्धिक आणि सांस्कृतिक नात्यांचे विलक्षण प्रतीक आहे."

Narendra Modi recieve gift in Croatia Visit
Voter ID in 15 Days | मतदार ओळखपत्र घरपोच मिळणार केवळ 15 दिवसांत; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि ट्रॅकिंग पद्धत...

पंतप्रधान मोदींकडूनही खास भेटवस्तू

क्रोएशियन राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच आणि पंतप्रधान प्लेंकोविच यांना पंतप्रधान मोदींनी भारताच्या समृद्ध कलासंस्कृतीचे प्रतीक म्हणून खास भेटवस्तू दिल्या. राष्ट्राध्यक्ष मिलानोविच यांना त्यांनी ओडिशाच्या सुप्रसिद्ध पटचित्र (Pattachitra) शैलीतील हस्तनिर्मित चित्र भेट दिले. 'पट्टा' म्हणजे कापड आणि 'चित्र' म्हणजे चित्रकला—या पारंपरिक शैलीत प्राचीन भारतीय कथा, देवता आणि दृष्य चित्रित केली जातात.

त्याचबरोबर, त्यांनी चांदीची आकर्षक कंदीलदिव्यांची जोडी देखील भेट दिली, जी भारतीय हस्तकलेचे प्रतीक मानली जाते.

भारत-क्रोएशिया संबंधांचा नवा अध्याय

पंतप्रधान मोदींचा हा दौरा क्रोएशियाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला, कारण भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. क्रोएशियन पंतप्रधानांनी स्वागत करताना म्हटले की, "हा दौरा दोन्ही देशांच्या राजकीय आणि आर्थिक सहकार्याच्या नवीन पर्वाची सुरुवात आहे."

2024 मध्ये भारत-क्रोएशिया व्यापार 242 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचला असून, 2025 च्या पहिल्या तिमाहीत यामध्ये 10% वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे.

या दौऱ्यात कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान, सांस्कृतिक देवाणघेवाण, विद्यापीठ सहकार्य यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.

Narendra Modi recieve gift in Croatia Visit
Ahmedabad Plane Crash Update| अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स निकामी; डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविणार?

मोदींना पुस्तकही भेट

क्रोएशियन राजनयिक डॉ. सिनीसा ग्रगिच यांनी लिहिलेल्या “Croatia & India, Bilateral Navigator for Diplomats and Business” या पुस्तकाची प्रतही पंतप्रधान मोदींना भेट म्हणून देण्यात आली. हे पुस्तक दोन्ही देशांच्या राजनैतिक आणि व्यापारी संबंधांचे तुलनात्मक विश्लेषण करते.

संरक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यटनामध्ये सहकार्य

भविष्यात दोन्ही देश संरक्षण, औषधनिर्माण, कृषी, आयटी, नवीकरणीय ऊर्जा, आणि अॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी क्षेत्रात सहकार्य वाढवणार आहेत. याशिवाय शिपबिल्डिंग, सेमिकंडक्टर, आणि कनेक्टिव्हिटी क्षेत्रातही संयुक्त उपक्रम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

एअर इंडिया दुर्घटनेबाबत संवेदना

अहमदाबादजवळ घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेबाबत पंतप्रधान प्लेंकोविच यांनी भारतीय जनतेप्रती आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनीही या दु:खद घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि सहवेदना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news