Voter ID in 15 Days | मतदार ओळखपत्र घरपोच मिळणार केवळ 15 दिवसांत; जाणून घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आणि ट्रॅकिंग पद्धत...

Voter ID in 15 Days | ECI चा मोठा निर्णय; SMS सूचनांसह अद्ययावत माहिती मिळणार
Voter ID in 15 Days
Voter ID in 15 Days Pudhari
Published on
Updated on

Voter ID card in 15 Days Election Commission of India Online Apply NVSP Portal Status Check Voter Card SMS Updates Fast Delivery

नवी दिल्ली : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मतदारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता मतदार ओळखपत्र (EPIC) केवळ 15 दिवसांत घरपोच मिळणार आहे. यापूर्वी यासाठी एका महिन्याहून अधिक वेळ लागत असे.

ही योजना नागरिकांसाठी सोयीची ठरणार असून, सेवा पुरवठा प्रक्रियेमध्ये गती आणि पारदर्शकता आणण्याचा यामागचा उद्देश आहे.

EPIC ट्रॅकिंग आता रिअल-टाइममध्ये...

  • रिअल-टाईम ट्रॅकिंग प्रणाली: ओळखपत्र तयार होण्यापासून ते वितरित होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ट्रॅकिंग करता येणार.

  • SMS सूचनांसह अद्ययावत माहिती: अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर SMS च्या माध्यमातून माहिती दिली जाईल.

  • विशेष IT मॉड्यूल: ECINet या प्लॅटफॉर्मवर एक खास IT प्रणाली तयार करण्यात आली आहे. यामध्ये डाक विभागाच्या API चे समाकलन करण्यात आले आहे, जेणेकरून EPIC वेळेत पोहोचेल.

  • वर्कफ्लो सुलभ व सुरक्षित: विद्यमान प्रक्रियेला पुनर्रचना करून अधिक सुसंघटित आणि डेटा सुरक्षित ठेवणारी नवी पद्धत राबवली जात आहे.

Voter ID in 15 Days
QS Rankings 2026 India | जगात MIT पुन्हा नंबर 1; पण भारतात कोण 'टॉप'वर? देशातील 54 विद्यापीठांचा जागतिक यादीत समावेश...

ऑनलाईन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा कराल?

  1. NVSP पोर्टलला भेट द्या: https://www.nvsp.in

  2. साइन-अप करा: उजव्या कोपऱ्यातील “Sign-Up” वर क्लिक करा. मोबाइल क्रमांक, ईमेल ID व captcha भरा.

  3. खाते तयार करा: नाव, पासवर्ड व त्याची पुष्टी करा. OTP मागवा.

  4. OTP पडताळणी: मोबाईल व ईमेलवर आलेला OTP टाकून खाते पडताळा.

  5. Login करा: मोबाईल क्रमांक, पासवर्ड, captcha कोड टाकून लॉगिन करा आणि OTP ने खातं पडताळा.

  6. Form 6 भरा (नवीन मतदार नोंदणीसाठी): तुमचे वैयक्तिक, नातेवाईक, संपर्क आणि पत्ता तपशील भरा.

  7. कागदपत्रे अपलोड करा: आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

  8. अर्ज सबमिट करा: सर्व तपशील नीट तपासून अर्ज सादर करा.

मतदार ओळखपत्राचा अर्ज ट्रॅक कसा कराल?

  1. NVSP पोर्टलवर लॉगिन करा: https://www.nvsp.in

  2. ‘Track Application Status’ विभागात जा

  3. तुमचा संदर्भ क्रमांक टाका (Form 6/6A सबमिट केल्यावर मिळतो)

  4. राज्य निवडा आणि Submit क्लिक करा

  5. तुमचा अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे पाहता येईल

Voter ID in 15 Days
Ahmedabad Plane Crash Update| अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स निकामी; डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविणार?

महत्त्वाच्या टीप्स

  • मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना योग्य कागदपत्रे (ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, फोटो) अपलोड करावेत.

  • सर्व सूचना SMS द्वारे मिळतील, त्यामुळे मोबाईल नंबर अचूक असावा.

  • अर्ज आणि ट्रॅकिंगसाठी NVSP पोर्टल किंवा Voter Helpline अ‍ॅप वापरता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news