SpaDeX मोहिम यशस्वी ! ISROने रचला नवीन इतिहास

SpaDeX Mission | अवकाशात 'डॉकिंग' करणारा भारत ठरला 'चौथा' देश
SpaDeX Mission
SpaDeX Mission |SpaDeX मोहिम यशस्वी ! ISROने रचला नवीन इतिहासFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) अंतराळात दोन उपग्रहांची आज (दि.१६) यशस्वी 'डॉकींग' चाचणी करत नवीन इतिहास रचला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अंतराळ डॉकिंगमध्ये प्रभुत्व मिळवणारा चौथा देश ठरला आहे. या संदर्भातील माहिती इस्रोने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया 'एक्स' अकाऊंटवरून दिली आहे.

'डॉकिंग' करणारा भारत ठरला 'चौथा' देश 

भारताची महत्त्वाकांक्षी 'स्पाडेक्स' मोहिमेचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ३० डिसेंबर रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. या मोहिमेत पीएसएलव्ही (PSLV) रॉकेट वापरून सुमारे २२० किलो वजनाचे दोन खास डिझाइन केलेले उपग्रह प्रक्षेपित करण्याचे उद्दिष्ट्ये समाविष्ट करण्यात आले होते. चेसर (SDX01) आणि टार्गेट (SDX02) असे हे उपग्रह पृथ्वीपासून ४७० किलोमीटर उंचीवर इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे 'डॉक' करण्यात आले. भारताच्या अवकाश तंत्रज्ञातील ही कामगिरी उल्लेखनिय आहे. कारण रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनी यापूर्वी अशा गुंतागुंतीच्या स्पेस डॉकिंग तंत्रांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यानंतर भारताने देखील डॉकिंग प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण करून जागतिक स्तरावर अवकाश क्षेत्रात मैलाचा दगड पार केला आहे.

'SpaDeX'चे तंत्रज्ञान अनेक मोहिमांसाठी अत्यावश्यक

भारताच्या डॉकिंग प्रात्यक्षिकांच्या यशस्वी प्रयोगामुळे इथून पुढील अनेक अवकाश मोहिमांमधील उद्दिष्ट्य पार करण्यास मदत होणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. चंद्रावर भारतीयांचे स्थलांतर, चंद्रावरून नमुने परत करणे, भारतीय स्पेस स्टेशनची (बीएएस) उभारणी आणि ऑपरेशन इत्यादी भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे तंत्रज्ञान आवश्यक आहे. सामान्य मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपण आवश्यक असताना अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान आवश्यक आहे. या मोहिमेतील यशस्वी कामगिरीमुळे भारत अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनला आहे.

SpaDeX मोहिमेची अशी आहेत 'उद्दिष्टे'

SpaDeX मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे कमी-पृथ्वी वर्तुळाकार कक्षेत दोन लहान अंतराळयानांच्या (SDX01-चेसर) आणि (SDX02 टार्गेट) यांची भेट, डॉकिंग आणि अनडॉकिंगसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान विकसित करणे आणि प्रदर्शित करणे. या मोहिमेच्या दुय्यम उद्दिष्टांमध्ये डॉक केलेल्या अंतराळयानांमधील विद्युत उर्जेच्या हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक, जे भविष्यातील अंतराळातील रोबोटिक्स, संमिश्र अंतराळयान नियंत्रण आणि अनडॉकिंगनंतर पेलोड ऑपरेशन्स अनुप्रयोगांसाठी आवश्यक आहे, असे देखील इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news