मस्क यांची 'SpaceX' 'ISRO'सोबत 'GSAT-20' उपग्रह प्रक्षेपित करणार

India's GSAT-N2 | हवाई प्रवासात मिळ‍णार इंटरनेट सुविधा
SpaceX & ISRO: GSAT-20
SpaceX ISRO सोबत भारताचा GSAT-20 उपग्रह प्रक्षेपित करणारFile Photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आपला नवीन कम्युनिकेश उपग्रह जीसॅट (GSAT-20- New communication satellite) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे. यासाठी इस्रो अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या (SpaceX) मदतीने ही मोहिम राबणार आहे. स्पेस एक्सच्या Falcon 9 रॉकेटचा वापर करून इस्रो आपला नवीन संचार उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचेदेखील वृत्तात म्हटले आहे.

India's GSAT-20 : भारताचा संचार उपग्रह (communication satellite )

या संचार उपग्रहाला GSAT-N2 असे नाव देण्यात आले आहे आणि त्याला GSAT-20 असेही म्हटले जाते, जे भारतात विमानात इंटरनेट सेवा प्रदान करेल. सध्या, भारतामध्ये इन-फ्लाइट इंटरनेट ॲक्सेस सुविधा प्रतिबंधित आहे. एअरलाइन्सने भारतीय हवाई क्षेत्रावरून उड्डाण करत असताना इटरनेट सेवा बंद करणे आवश्यक आहे. परंतु, सरकारने अलीकडेच भारतातील विमानांतर्गत इंटरनेट सेवांना परवानगी देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, विमान 3,000 मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर एअरलाइन्स वाय-फाय-आधारित इंटरनेट सेवा देऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याचवेळीच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरास परवानगी

नवीन नियमावली सादर करताना सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, जेव्हा विमान विशिष्ट उंचीवर पोहचेल तेव्हाच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास ऑनबोर्ड परवानगी दिली जाईल. तेव्हाच प्रवाशाना Wi-Fi द्वारे इंटरनेट सेवा वापरण्याची परवानगी दिली जाईल. केंद्र सरकारची नवी नियमावली आणि इस्रोचे प्रयत्न यामुळे हवाई प्रवाशांना प्रवासात देखील लवकरच इटरनेट वापरण्याची परवानगी मिळणार आहे.

ISRO एलन मस्क यांच्या SpaceX ची मदत का घेत आहे? 

भारताचे स्वतःचे लाँच व्हेईकल मार्क-3 भूस्थिर स्थानांतर कक्षेत जास्तीत जास्त 4,000 किलो वजन उचलू शकते, तथापि, GSAT-N2 चे वजन 4,700 किलोग्रॅम आहे जे भारताच्या स्वतःच्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करणे खूप जड आहे, ज्यामुळे इस्रोला SpaceX ची मदत मागणे भाग पडले आहे. एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे Falcon 9 रॉकेट जड प्रक्षेपण करण्यास सक्षम आहे. हे इस्रोची खासगी शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) अंतर्गत एक व्यावसायिक भागिदारी आहे. स्पेसएक्ससोबत इस्रोचे हे पहिलेच व्यावसायिक प्रक्षेपण असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news