Monsoon Update 2024| यंदा ६ दिवस आधीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापला

'या' राज्यात अलर्ट
Monsoon 2024 Update
नैऋत्य मान्सूनने संपूर्ण भारत व्यापलाIMD Website

पुढारी ऑनलाईन डेस्क: नैऋत्य मान्सून वाऱ्याने आज (दि.२ जुलै) संपूर्ण भारताचा मैदानी प्रदेश व्यापला आहे. नियमित ८ जुलै रोजी मान्सून वारे संपूर्ण देश व्यापतात. परंतु यंदा ६ दिवसपूर्वीच नै.मान्सून वारे संपूर्ण देशात पोहचले आहेत, या संदर्भातील वृत्त भारतीय हवामान विभागने दिले आहे.

आधी ६ दिवस मान्सूनने देश व्यापला

आयएमडीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "नैऋत्य मान्सून आज (दि.२ जुलै) राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये पुढे सरकला आहे. त्यामुळे ८ जुलैच्या सामान्य तारखेच्या तुलनेत मंगळवार २ जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. केरळ आणि ईशान्येकडील प्रदेशात 30 मे रोजी मान्सून नेहमीपेक्षा दोन आणि सहा दिवस आधी दाखल झाला.

कोल्हापूरसह 'या' भागात पावसाचा जोर वाढणार

पुढील २४ तासांत राज्यातील बहुतांशी भागांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पश्चिम महराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर, नाशिक आणि महाराष्ट्रातील घाट भागात खूप चांगले ढग विकसित झाले आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ तासांत या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागने वर्तवली आहे.

जुलैमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस;IMDची माहिती

IMD ने सोमवारी सांगितले की, भारतात जुलैमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, मुसळधार पावसामुळे पश्चिम हिमालयातील राज्ये आणि देशाच्या मध्यवर्ती भागात नदी खोऱ्यात पूर येऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news