Sonia Gandhi: राजीव गांधींसोबत पहिली भेट कशी आणि कुठे झाली? सोनिया गांधींनी पहिल्यांदाच सांगितली 'लव्ह स्टोरी'

Sonia Gandhi Rajiv Gandhi love story: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका व्हिडिओ पोस्टमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली.
Sonia Gandhi Rajiv Gandhi love story
Sonia Gandhi Rajiv Gandhi love storyFile Photo
Published on: 

Sonia Gandhi Rajiv Gandhi love story:

नवी दिल्ली: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अधिकृत पदार्पण केले आहे. त्यांनी आपले आगामी आत्मचरित्र 'बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' बद्दल माहिती देत एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतच्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली आहे. इंग्लंडमध्ये विद्यार्थी असताना त्यांची भेट एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये कशी झाली, याचा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना सोनिया गांधी म्हणाल्या, "इंग्लंडमध्ये शिकत असताना इटालियन जेवणाचा शोध घेत असताना एका ग्रीक हॉटेलमध्ये माझी राजीव गांधींशी पहिली भेट झाली. तिथे अनेक युरोपियन आणि भारतीय विद्यार्थी जेवणासाठी येत असत."

"एका मित्राने आमची ओळख करून दिली आणि पहिल्याच भेटीत मला ते मनापासून आवडले. राजीव यांचा मनाला भावणारा मुख्य गुण म्हणजे त्यांचा अत्यंत नम्र आणि शांत स्वभाव. त्यांचा तोच साधेपणा माझ्या मनाला थेट स्पर्श करून गेला. मला नंतर समजलं की राजीवच्या मनातही माझ्याबद्दल तसाच विचार होता."

"त्यानंतर आम्ही मित्र बनलो. आम्ही मित्रांसोबत पार्ट्यांमध्ये जायचो, फिरण्यासाठी बाहेर पडायचो, एकदा आम्ही एका 'व्हॅलेंटाईन पार्टी'लाही गेलो होतो, जिथे खूप विद्यार्थी होते.” या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि २५ फेब्रुवारी १९६८ रोजी त्यांचा विवाह झाला.

दरम्यान, याआधी सोनिया गांधी यांनी 'इन्स्टाग्राम'वरही खाते सुरू केले आहे. आपल्या पुस्तकाबद्दल त्यांनी सांगितले की, "माझं हे आत्मचरित्र म्हणजे केवळ आठवणींचा संग्रह नसून प्रेम, कर्तव्य, वैयक्तिक नुकसान आणि भारतासारख्या देशात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा एक प्रवास आहे."

या पुस्तकाच्या माध्यमातून सोनिया गांधींचा इटलीतील बालपणापासून ते भारतातील राजकीय व वैयक्तिक संघर्षांपर्यंतचा संपूर्ण प्रवास वाचकांसमोर येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news