

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटासंबंधी तक्रारींमुळे गुरूवारी (दि.२०) सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वस्थ असल्याने गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य ताप होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या.