Smartphone: आता चोरलेला स्मार्टफोन आपोआप होणार बंद; काय आहे 'कील स्विच' तंत्रज्ञान?

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी चोरलेले स्मार्टफोन निकामी करण्यासाठी एक नवीन 'कील स्विच' तंत्रज्ञान विकसित केले आहे.
Smartphone
Smartphonefile photo
Published on
Updated on

Smartphone anti theft lock

लंडन: मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी ब्रिटनमधील नामांकित टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. 'व्हर्जिन मीडिया ओ२' आणि 'व्होडाफोन-थ्री' या ब्रिटनमधील दोन सर्वात मोठ्या मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी आपल्या दुकानांतून चोरलेले स्मार्टफोन निकामी करण्यासाठी एक नवीन 'कील स्विच' तंत्रज्ञान विकसित केले आहे.

'द फायनान्शियल टाइम्स'च्या वृत्तानुसार, ॲपल आणि सॅमसंग यांसारख्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्यांनी जागतिक स्तरावर अशा प्रकारची 'अँटी-थेफ्ट लॉक' यंत्रणा आणण्यास नकार दिल्यानंतर, टेलिकॉम कंपन्यांनी स्वतःच हे पाऊल उचलले आहे.

Smartphone
World War II Mysterious Photo | दुसऱ्या महायुद्धातील रहस्यमय फोटोमुळे ‘टाईम ट्रॅव्हल’चे दावे

या अत्याधुनिक ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश चोरीच्या मोबाईलची काळी बाजारपेठ पूर्णपणे मोडीत काढणे हा आहे. गेल्या काही काळात मोबाईल दुकानांवरील दरोडे आणि चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एकट्या लंडन शहरात गेल्या वर्षी ७० हजारांहून अधिक लोकांना मोबाईल चोरीचा फटका बसला आहे. या गुन्हेगारी टोळ्यांना चाप लावण्यासाठीच हे तंत्रज्ञान आणले गेले आहे.

कसे काम करते हे 'कील स्विच' तंत्रज्ञान?

हे सुरक्षा तंत्रज्ञान केवळ दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या नवीन स्मार्टफोनवरच काम करेल, जे अद्याप ग्राहकांनी खरेदी केलेले नाहीत. जसा एखादा फोन दुकानातून चोरला जाईल आणि तो चालू केला जाईल, तसा तो थेट संबंधित मोबाईल उत्पादक कंपनीच्या डेटाबेसमध्ये 'चोरीचा फोन' म्हणून नोंदवला जाईल. डेटाबेसमध्ये नोंद होताच, एका 'रिमोट कमांड'द्वारे तो हँडसेट पूर्णपणे लॉक केला जाईल. यामुळे तो फोन वापरणे किंवा विकणे अशक्य होईल.

जर ग्राहकाने फोन कायदेशीररीत्या खरेदी केला असेल, तर टेलिकॉम कंपन्या तो फोन बंद करू शकत नाहीत. कारण विक्री झाल्यानंतर त्या उपकरणाची मालकी नेटवर्क कंपनीकडे राहत नाही. यापूर्वी नेदरलँड्समधील मोबाईल कंपन्यांनीही आपल्या स्टॉकच्या सुरक्षिततेसाठी अशाच प्रकारचे पाऊल उचलले होते.

टेक कंपन्या आणि पोलिसांमधील वाद

चोरीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बाजारातील मूल्य शून्यावर आणण्यासाठी स्मार्टफोनमध्ये इन-बिल्ट 'कील स्विच' असावा, अशी मागणी पोलीस दल आणि विविध व्यापारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. ब्रिटनमधील नेटवर्क कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'मोबाईल युके' या संस्थेने गेल्या वर्षी गृहमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे, 'ॲपल' कंपनी आधीपासूनच त्यांच्या स्वतःच्या अधिकृत स्टोअर्समधून चोरलेल्या उपकरणांसाठी अशाच प्रकारची 'कील स्विच' प्रणाली वापरते, मात्र ती सार्वत्रिक करण्यास कंपन्यांचा विरोध आहे.

Smartphone
Belgaum Mobile Theft: चोरट्यांनी विकले; पोलिसांनी शोधले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news