Car Fire Accident | हरियाणातून हरिद्वारला जाणारे ६ जण कारमध्ये जिवंत जळाले

१२० कि.मी. वेगाने खांबाला धडकली; कोणीही बाहेर पडू शकले नाही
Car Fire Accident |
Car Fire Accident | हरियाणातून हरिद्वारला जाणारे ६ जण कारमध्ये जिवंत जळाले
Published on: 
Updated on: 

हिसार; वृत्तसंस्था : हरियाणातून हरिद्वारला कारमधून जात असलेल्या ६ जणांचा कारच्या अपघातानंतर करुण अंत झाला आहे. अपघातानंतर कारला लागलेल्या आगीत हे सहाजण जिवंत जळाले. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मुझफ्फरनगर महामार्गावर या कारचा अपघात झाला.

ताशी १२० कि.मी. वेगाने धावणारी कार प्रथम विजेच्या खांबाला धडकली. त्यानंतर दुभाजक तोडत दुसऱ्या लेनमध्ये जाऊन उलटली. कारमध्ये एकूण ६ जण प्रवास करत होते. सर्वजण हरियाणातील हिसारच्या राखी गढी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते हरिद्वारला जात होते. धडक इतकी भीषण होती की विजेच्या खांबाचे २ तुकडे झाले. दुभाजकाचा १० मीटरचा भाग चक्काचूर झाला.

पाहतापाहता कारने पेट घेतला. आगीच्या उंचचउंच ज्वाळा उठू लागल्या. हा अपघात मुझफ्फरनगर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर, पानीपत-खटीमा राष्ट्रीय महामार्गावरील तितावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जग्गाहेडी येथे सकाळी ५ वाजता झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

केवळ सांगाडे उरले...

कारचा दरवाजा तोडला असता आत केवळ मानवी सांगाडे उरले होते. पोलिसांनी ते पिशव्यांमध्ये भरून शवविच्छेदनासाठी पाठवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, वेगात असल्याने कार अचानक डगमगू लागली आणि उलटली. तिच्यातून धूर निघाला आणि आग लागली. गाडी पलटल्यामुळे आत बसलेले गंभीर जखमी झाले होते, त्यामुळे ते बाहेर पडण्याचा प्रयत्नही करू शकले नाहीत. अपघातानंतर महामार्गावर लांबच लांब वाहतूक कोंडी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.