हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी 'एसआयटी'चा अहवाल सादर

१३२ जणांचे नोंदवले जबाब, स्‍थानिक अधिकार्‍यांसह आयोजक जबाबदार
Hathras stampede
हाथरस येथे चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ८७ वर पोहोचली आहे.File photo

उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने आपला ८५५ पानांचा अहवाल राज्‍य सरकारला सादर केला आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. चेंगराचेंगरीची कारणे, अज्ञान आणि निष्काळजीपणा याला जबाबदार कोण? इतर तथ्ये अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

स्वयंघोषित आध्‍यामिक गुरु सूरज पाल सिंग उर्फ भोले बाबा याच्‍या 'सत्संग' कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत फुलारी गावात 121 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुपम कुलश्रेष्ठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक होते.

Hathras stampede
Hathras stampede | हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण: अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजारींचा मोठा आरोप

एसआयटी अहवाल काय सांगतो?

चेंगराचेंगरीची मूळ कारणे शोधण्‍यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आपला ८५५ पानांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. एसआयटीने १३२ जणांचे जबाब नोंदवले. या अहवालात म्‍हटलं आहे की, 'सत्संगा'चे आयोजन करणार्‍या समितीने परवानगीपेक्षा अधिक गर्दी केली होती. पोलीस ठाणे-तहसील ते काही जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाल्‍याचेही समोर आले आहे.एसआयटीच्या अहवालात अनेक अधिकारी आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात आले होते. चेंगराचेंगरीची कारणे, अज्ञान आणि निष्काळजीपणा याला जबाबदार कोण? इतर तथ्ये अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

Hathras stampede
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य ओरीपाला अटक

प्रत्यक्षात एसआयटीचा अहवाल शनिवार, ६ जुलै रोजीच तयार झाला. रविवारी दिवसभर याचे टायपिंग सुरूच होते. त्यात सोमवारी सकाळी काही सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी उशिरा हा अहवाल विशेष दूताद्वारे विशेष देखरेखीखाली शासनाकडे पाठविण्यात आला. दरम्‍यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ब्रिजेश कुमार श्रीवास्तव आणि निवृत्त आयपीएस अधिकारी हेमंत राव यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र न्यायिक आयोगही हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news