Vijayapura Bhutnal Lake Lake News: धक्कादायक! विजापूर भागातील ऐतिहासिक 'भूतानाळ' तलावात आढळले ६ मृतदेह

Vijayapura Bhutnal Lake Lake News
Vijayapura Bhutnal Lake Lake Newspudhari
Published on
Updated on

अंकली : प्रतिनिधी

Vijayapura Bhutnal Lake Lake News:

विजापूर शहराच्या बाहेरील ऐतिहासिक भूतनाळ तलावात बुधवारी सहा जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतांमध्ये चार महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. एकाच वेळी सहा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Vijayapura Bhutnal Lake Lake News
Karnataka Robbery | कित्तूर येथील सराफी दुकान फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा

तलाव पाहण्यासाठी आले असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तलावाच्या काठावर मृतदेह तरंगताना दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शहराचे डीवायएसपी नागराज, आदर्शनगर पोलिस ठाण्याचे पीएसआय सीताराम लमाणी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Vijayapura Bhutnal Lake Lake News
Belgaon Investment Scam|१६० कोटींचा गुंतवणूक घोटाळा : ट्रेडिंग कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक

अग्निशमन दलाच्या जवानांकडून तलावातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news