Belgaon Investment Scam|१६० कोटींचा गुंतवणूक घोटाळा : ट्रेडिंग कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक

१६० कोटींचा गुंतवणूक घोटाळा : तीन हजारहून अधिकांच्या फसवणुकीचा आरोप
Belgaon Investment Scam
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जादा परताव्याचे आमिष दाखवून तीन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांकडून तब्बल १६० कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारल्याच्या आरोपावरुन टिळकवाडी पोलिसांनी 'अपेक्स बिझकॉर्प एलएलपी' या ट्रेडिंग कंपनीशी संबंधित एका व्यवस्थापकाला अटक केली आहे. अर्जुन महादेव वाघमारे (वय ३६, रा. मांगनूर ता. चिकोडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी कंपनीचे इतर संचालक व संबंधित व्यक्तींची चौकशी सुरु आहे. याबाबत अशोक वीरुपाक्षी बिसगुप्पी (रा. कौजलगी, ता. गोकाक) यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Belgaon Investment Scam
Hotel Murder Case | फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दोन मुलींची हत्या करून बापाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न

गुंतवणुकीच्या रकमेतून शेअर बाजार तसेच स्थावर मालमत्तेत व्यवहार केल्याचे तसेच काही रकमेचा गैरवापर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कंपनीत पैसे गुंतविण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर गुंतवणुकीच्या रकमेतून विविध मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचेही पोलिस टिळकवाडीतील मंगळवार पेठेत असलेल्या या कंपनीने तीन हजारांहून अधिक लोकांकडून सुमारे १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक काशिनाथ वाघमारे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम २१ (१), २१ (२), केपीआयडी कायदा कलम ९, तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल आहे.

Belgaon Investment Scam
Two Month Old Baby killed Case | विहिरीत फेकले, बेपत्ता भासविले; दोन महिन्यांच्या चिमुरडीचा खून, आईसह चौघांना अटक

त्यापैकी अर्जुन वाघमारेला अटक करण्यात आली असून त्याला बंगळूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सध्या त्याला परप्पन अग्रहार कारागृहात ठेवण्यात आले आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुरामपुजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

पोलिस पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले. बेळगावात अलीकडच्या काळात मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांची प्रकरणे समोर आल्यानंतर पोलिस व प्रशासनाने अशा गुंतवणूक संस्थांवर लक्ष केंद्रित केले आहे. शिवम असोसिएट्स, आदित्यराज कॅपिटल्स आदी संस्थांवरील कारवाईनंतर आता आणखी एका ट्रेडिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सीआयडी तपास शक्य

५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक किंवा मोठ्या प्रमाणातील आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास सीआयडीकडे सोपविला जातो. त्यामुळे, अपेक्स बिझकॉर्प एलएलपी प्रकरणाचाही पुढील तपास सीआयडीकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news