Shashi Tharoor : "भारत म्हणजे बांगलादेश नाही हे बरोबर; पण..." : शशी थरुर यांनी दिले मंत्री रिजिजू यांना उत्तर

विरोधकांची मागणी केवळ पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकांचीच आहे
shashi tharoor reply to kiren rijiju
Published on: 
Updated on: 

shashi tharoor reply to kiren rijiju : देशात सध्या सुरू असलेल्या 'सत्तांतर' (रिजीम चेंज) शब्दावरून राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी "भारत म्हणजे बांगलादेश नाही," या विधानाशी सहमती दर्शवली आहे. मात्र, या वादाला वेगळे वळण न देता विरोधकांची मागणी केवळ पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुकांचीच असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

नेमका वाद काय?

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) या मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या मोहिमेच्या नावाखाली मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत जेएनयूची विद्यार्थिनी नेहा बोरा आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यासह काही नेत्यांनी 'सत्तांतरा'चा उल्लेख केला होता.

shashi tharoor reply to kiren rijiju
Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! चौघांचा मृत्यू; आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठेवले मृतदेह!

काय म्‍हणाले हाते रिजिजू?

यावरून केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ‘एक्स’ (ट्विटर) वर एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल केला. "हे लोक देशात सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवावी—भारत म्हणजे बांगलादेश नाही. भारतातील तरुण देशाची उभारणी करणारे आहेत, त्याचा विनाश करणारे नाहीत. आजचा तरुण स्टार्टअप, तंत्रज्ञान, क्रीडा आणि नवनिर्मितीच्या क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करत आहे," असे रिजिजू यांनी ठामपणे सांगितले.

shashi tharoor reply to kiren rijiju
Pakistan Cricket : इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत PCB ला झोंबली; इंग्लंडचे २ दिग्गज खेळाडू कमेंट्री पॅनेलमधून 'आऊट'!

भारत म्हणजे बांगलादेश नाही हे बरोबर; पण... थरूर यांचे प्रत्युत्तर

रिजिजू यांच्या या विधानावर बोलताना शशी थरूर म्हणाले, "भारत म्हणजे बांगलादेश नाही आणि भारत म्हणजे फ्रान्सही नाही. अशा तुलनांचा इथे काहीही संबंध नाही. फ्रान्समध्ये महागाईविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीचे किंवा हिंसाचाराचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. आमची मागणी अतिशय स्पष्ट आहे. देशात मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आली असून, ही प्रक्रिया अत्यंत चुकीची, अनियमित आणि बेकायदेशीर आहे. हा संविधानाशी जोडलेला मुद्दा आहे. सरकार पाडण्याचा किंवा अनधिकृतपणे सत्तांतराचा आमचा कोणताही हेतू नाही."

आंदोलनाची धार तीव्र

एसआयआर (SIR) मोहिमेद्वारे सुमारे १३ कोटी मतदारांची नावे हटवण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेस, डावे पक्ष आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) यांनी दिल्लीत निदर्शने सुरू केली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील या कारवाईबाबतचे सर्व आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news