

Shashi Tharoor Congress Protest: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी मान्य केलं की काँग्रेरच्या छात्रो की गूंज या कार्यक्रमाला कॉक्रोज जनता पार्टीने केलेल्या विद्यार्ती आंदोलनाएवढा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसने जे प्रश्न छात्रो की गूंज च्या माध्यमातून उचलले होते. तेच प्रश्न कॉक्रोज जनता पार्टीने उचलले होते. तरी देखील काँग्रेसला जेन झी आणि तरूणांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही.
शशी थरूर हे मुंबईतील इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनाईट नेशन्स (IIMUN) च्या १५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमातील एका चर्चा सत्रात थरूरने पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं सांगितलं.
जंतर मंतरवर झालल्या सीजेपीच्या आंदोनलाचा उल्लेख करून काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, 'सीजेपीने जंतर मंतरवर ज्या मुद्द्यांना घेऊन आंदोलन केलं ते मुद्दे आम्ही फार आधीच उचलून धरले होते. आमचा छात्रों की गूंज कार्यक्रम सुरूच होता. त्यात राहुल गांधी स्वतः पेपर लीकचा मुद्दा घेऊन विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. मात्र आम्हाला स्वतःला हा प्रश्न विचारावा लागेल की आमच्याकडून काय चूक झाली? आम्ही विद्यार्थ्यांचे योग्य प्रकारे ऐकले नाही का? जेन झीची नस ओळखण्यात आम्ही कमी पडलो का? याचा शोध घेतला गेला पाहिजे.
नीट युजी २०२६ परीक्षा गोंधळ आणि पेपर लीगनंतर सीजेपीने २० जून रोजी जंतर मंतरवर मोठं आंदोलन सुरू केलं होतं. विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या यांच्या राजीनाम्यासह जबाबदारी निश्चित झाली पाहिजे अशी मागणी केली होती.
ज्यावेळी सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनात आमरण उपोषण सुरू केलं त्यानंतर हे आंदोलन मोठं झालं. त्यात सरकारने सोनम वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून उचलून नेल्यानंतर आंदोलनाला मोठे जनसमर्थन मिळू लागलं.
त्यानंतर २० जुलै रोजी संसद मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील लाठीचार्ज आणि पॅलेट गनचा वापर झाला अन् आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तिथून सरकार बॅकफूटला आलं अन् त्यांना धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला.
काँग्रेसचे छात्रो की गूंज हे आंदोलन सुरू केलं होतं. यात पेपर लीक हा सर्वात मोठा प्रश्न होता. या प्रश्नी काँग्रेस विद्यार्थी संघटना एनएसयूआई (NSUI) देखील सामील झाली होती. मे महिन्यात २०२६ च्या परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीत एनएसयुआने मोठं आंदोलन केलं होतं.
त्यानंतर लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी १७ जून रोजी राजस्थानमधील कोटी मध्ये छात्रों की गूंज या अभियानाची सुरूवात केली. राहुल गांधी यांनी देशातील युवक आता या व्यवस्थेविरूद्ध उठावर करत आहे. काँग्रेस त्यांचा आवाज देशाच्या काना कोपऱ्यात पोहचवणार आहे असं सांगितलं.
असं असतानाही शशी थरूर हे काँग्रेसचे आंदोलन फारसे प्रभावी ठरले नाही असं म्हणजे वेगळीच चर्चा निर्माण करू इच्छितात. त्यांच्या मते विरोधी पक्षांनी नवीन पिढीशी कनेक्ट होण्यासाठी अजून वेगवेगळ्या रणनिती आत्मसात करण्यात याव्या असे मत नोंदवलं आहे.