Shashi Tharoor convoy attack | काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्‍या ताफ्‍यावर हल्‍ला, सुरक्षा रक्षकासह चालक जखमी

Shashi Tharoor convoy attack | विधानसभा प्रचारासाठी जाता असताना धक्‍कादायक प्रकार, एक ताब्‍यात चौघांचा शोध सुरु
Shashi Tharoor convoy attack
खासदार शशी थरूर. File Photo.
Published on
Updated on

Shashi Tharoor convoy attack

मलप्पुरम : केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी निघालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर शुक्रवारी सायंकाळी हल्ला झाला. या घटनेत थरूर यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक आणि चालक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे.

वाहतूक कोंडीवेळी पाच जणांच्‍या टोळक्‍याने केला हल्‍ला

ही घटना मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर येथील थिरुवली नजीकच्या चेल्लीथोड पुलावर शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. शशी थरूर हे काँग्रेसचे उमेदवार ए. पी. अनिलकुमार यांच्या निवडणूक प्रचारासाठी जात होते. पुलाजवळ अरुंद रस्ता असल्याने तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, दोन वाहनांनी थरूर यांच्या गाडीला अडवले. गाडीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे उपस्थित असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने थरूर यांच्या सुरक्षा रक्षकांवर आणि चालक सतीश के. पी. यांच्यावर अचानक हल्ला केला.

Shashi Tharoor convoy attack
Shashi Tharoor | वंदेमातरम्‌ची सक्ती नको, शशी थरुर यांनी अशी मागणी का केली? कोणता संदर्भ दिला?

"अडथळ्यांमुळे आम्ही थांबणार नाही"

या घटनेची माहिती शशी थरूर यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्‍ट करुन दिली. त्‍यांनी पोस्‍टमध्‍ये म्‍टहलं आहे की, "माझ्या सुरक्षा रक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे मी व्यथित आहे, मात्र मी पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा अडथळ्यांमुळे आम्ही थांबणार नाही. आमचे सर्व नियोजित कार्यक्रम वेळेत पूर्ण झाले असून, आमचा निवडणूक प्रचार विनाअडथळा सुरू राहील," असे त्यांनी स्पष्ट केले.

Shashi Tharoor convoy attack
Shashi Tharoor |काँग्रेस नेते शशी थरुर यांनी किंग कोब्रा पकडणार्‍या महिला वनकर्मचाऱ्याचे केले कौतूक, पाहा व्हिडीओ

एक संशयित ताब्‍यात, चौघांचा शोध सूरु

या प्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून वंडूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर चार आरोपींची ओळख पटली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके छापेमारी करत आहेत.

Shashi Tharoor convoy attack
Shashi Tharoor | "मला पश्चात्ताप... " : शशी थरूर 'ऑपरेशन सिंदूर'वरील विधानावर ठाम

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले

शशी थरुर यांच्‍यावरील हल्‍ल्‍यानंतर केरळच्‍या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, वंडूर येथे यूडीएफ (UDF) उमेदवाराचा प्रचार करताना थरूर यांनी काँग्रेस आघाडी बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत विचारले असता, निवडणुकीनंतर पक्षश्रेष्ठी आणि नवनिर्वाचित आमदार यावर निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. केरळमधील १४० विधानसभा जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ मे रोजी निकाल जाहीर होतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news