

Recruiter
नोएडा : नोएडामधील एका तरुणीने येथील खासगी संस्थेमध्ये पर्सनल असिस्टंट पदासाठी अर्ज केला होता. आकर्षक पगार असल्यामुळे तिने हा पर्याय निवडला. मात्र, भरती प्रक्रियेदरम्यान संबंधित भरती करणाऱ्या व्यक्तीची (रिक्रूटरने) वागणूक अत्यंत त्रासदायक व संशयास्पद वाटल्याने अस्वस्थ असल्याचे, त्या तरुणीने म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट तिने रेडीट पेज 'r/IndiaCareers' या करियरच्या प्लॉटफॉर्मवर शेअर केली आहे.
संबंधित तरुणीने "मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय, असं वाटणं चुकतंय का?", असे कॅप्शन देत, पोस्ट शेअर केली आहे. तिने म्हटले आहे की 'मी नोकरीसाठी अर्ज केल्यावर, भरती करणाऱ्या व्यक्तीने मला वैयक्तिक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अगदी मी विवाहित आहे का, हेसुद्धा विचारलं," असेही तिने सांगितले. या तरुणीने दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.
स्क्रीनशॉर्टस् पोस्टमध्ये नोकरी मागणारी तरुणी आणि रिक्रूटर यांच्यामधील संभाषण दिसत आहे. यामध्ये तरुणी पगाराबद्दल विचारत असताना रिक्रूटरने तिचा पूर्ण फोटो मागितला. नंतर त्याने तरुणीकडे इन्स्टाग्राम प्रोफाईलही शेअर करण्यास सांगितले. पुढे म्हटले आहे की, "तुझा पूर्ण फोटो पाठव, म्हणजे ते पीएम प्रोफाइलसाठी तुमची पर्सनॅलिटी दाखवण्यास मदत करेल". यावर तरुणीने कठोर शब्दात रिक्रूटरला सुनावल. तिने म्हटले की, "मी विचारू शकते का की हे का रेलिवेंट आहे? जर तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल करायचा असेल, मला तिथेच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंद होईल".
नोकरी मागणी तरुणी आणि रिक्रूटर यांच्यातील संभाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यावर नेटकऱ्यां रिक्रूटरच्या वागणुकीवर टीका केली आहे, इतरांना नोकरी शोधताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. तसेच या घटनेची तक्रार संबंधित कंपनी किंवा पोर्टलला करण्याचा सल्ला देखील दिला आहे.