Seema Haider : सीमा हैदरला जीवे मारण्याचा प्रयत्न; हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात

Seema Haider News : दाम्पत्यांनी काळी जादू केल्याचा हल्लेखोराचा आरोप
Seema Haider
सीमा हैदरला जीवे मारण्याचा प्रयत्न
Published on
Updated on

Seema Haider News

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पतीला सोडून आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिच्यावर एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सीमाने आरडाओरडा केल्याने कुटुंबातील सदस्यांसह शेजाऱ्यांनी घरात प्रवेश केला व हल्लेखोराला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तेजस असे या हल्लेखोराचे नाव असून तो गुजरातमधून आला आहे. तसेच त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे.

Seema Haider
Seema Haider : सीमा हैदरला तिचे कुटुंब व शेजाऱ्यांनी नाकारले; म्हणाले, ती आता मुसलमान नाही…

काळी जादू केल्याचा हल्लेखोराचा आरोप

पोलिसांनी ताब्यात घेऊन हल्लेखोर तेजसची चौकशी केली असता तेजसने सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांनी काळी जादू केल्याचा आरोप केला आहे. तेजस हा गुजरातहून बसने येत सीमा हैदरच्या घरी पोहचला. त्यानंतर बंद असलेल्या दाराला लाथ मारली. सीमा हैदरने दरवाजा उघडताच त्याने घरात प्रवेश करत तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडाओरडा केल्याने कुटुंबासह शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोराच्या तावडीतून तिला सोडवत नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रियकरासाठी चार मुलांसह पाकिस्तानातून आली होती सीमा हैदर

सीमा हैदर आणि सचिन मीणा या दोघांची ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानी सीमा हैदर पतीला सोडून आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. हा संपूर्ण प्रकारच संशयास्‍पद असल्‍याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरु केली होती. तसेच तिच्या हालचालींवरही पोलिसांनी बारिक लक्ष ठेवले होते.

Seema Haider
Seema Haider News : ‘प्रियकरा’साठी भारतात आलेली सीमा हैदर कशी सापडली संशयाच्‍या भोवर्‍यात? जाणून घ्‍या सविस्‍तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news