Manipur News |मणिपूरमध्‍ये ३२८ बंदुका, ग्रेनेडसह मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्‍या माहितीनंतर सुरक्षा दलांची पाच जिल्‍ह्यांत धडक कारवाई
Manipur News
मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या पाच इंफाळ खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.photo Ani
Published on
Updated on

मणिपूर पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी मणिपूरच्या पाच इंफाळ खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. १३-१४ जूनच्या मध्यरात्री इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपूर, काकचिंग आणि थौबल जिल्ह्यांत ही धडक कारवाई करण्‍यात आल्‍याचे मणिपूर पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सलग दाेन दिवस राबवली शाेध माेहिम

१३-१४ जूनच्या मध्यरात्री, मणिपूर पोलिस, सीएपीएफ, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकांनी ५ खोऱ्यातील जिल्ह्यांच्या बाहेरील भागात शोध मोहीम सुरू केली. संयुक्त पथकांनी स्फोटके आणि इतर युद्धसामग्री जप्त केली. १५१ एसएलआर रायफल्स, ६५ इन्सास रायफल्स, इतर प्रकारच्या ७३ रायफल्स, पाच कार्बाइन गन, २ एमपी-५ गन आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आल्या, अशी माहिती माहिती अतिरिक्‍त पोलीस महानिरीक्षणक लहरी दोरजी लहटू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Manipur News
मणिपूर, अरुणाचल आणि नागालँडमध्ये 'अफ्स्पा'ला ६ महिने मुदतवाढ

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्‍या माहितीनंतर कारवाई

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे मणिपूर पोलीस आणि सुरक्षा दलांनी सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांची आणि त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई केली आहे, असेही लहटू यांनी स्‍पष्‍ट केले.

Manipur News
सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांचे शिष्टमंडळ मणिपूर दौऱ्यावर

भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने स्पीअर कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली, २६ मे ते ५ जून दरम्यान मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने कांगपोक्पी, थौबल, काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर, जिरीबाम, इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम या डोंगरी आणि खोऱ्यातील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणांवर आधारित ऑपरेशन्स सुरू केल्या, असे एका निवेदनात म्‍हटले आहे. या ऑपरेशन्समध्ये २३ फुटीरवादी नेत्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news