

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांचे शिष्टमंडळ शनिवारी मणिपूर दौऱ्यावर होते. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील मदत शिबिरांना त्यांनी भेट दिली. न्यायमूर्ती बी. आर.गवई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश, न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर यांचा समावेश आहे.
मणिपूरमधील हिंसाचार पीडितांना कायदेशीर मदतीसाठी राष्ट्रीय कायदा सेवा प्राधिकरण विशेष मोहीम राबवणार आहे. या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा हा मणिपूर दौरा आहे. या शिष्टमंडळाने मणिपूरमधील हिंसाग्रस्तांना कायदेशीर आणि इतर मदतीचा आढावा घेतला. तसेच हिंसाग्रस्त लोकांच्या गरजा, अडचणी आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा केली.