

Chhattisgarh Naxalites Encounter |
छत्तीसगड : तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील जंगलात बुधवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १५ हून अधिक नक्षलवादी ठार झाले. करेगुट्टा टेकड्यांवरील जंगलात ही चकमक झाली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २१ एप्रिल रोजी करेगुट्टा टेकड्या आणि छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर असलेल्या टेकड्यांमध्ये 'मिशन संकल्प' नावाची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स, विशेष कार्य दल (STF), राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांची एलिट युनिट कोब्रा यासह विविध युनिट्सचे सुमारे २४ हजार सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत. बस्तर प्रदेशात सुरू केलेली ही सर्वात मोठी नक्षलवाद्यांविरोधी कारवाई म्हणून ओळखली जाते. बुधवारी बिजापूर जिल्ह्यात मोहिमेतील सुरक्षा दलांनी १५ हून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले.