'अकबर'ला महान म्हणणारी शालेय पुस्तके जाळून टाकू, 'या' मंत्र्यांचा इशारा

Rajasthan News : अकबरला ‘महान’ म्हणणे म्हणजे मूर्खपणा
Rajasthan News, Mughal emperor Akbar, Rajasthan education minister Madan Dilawar
राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुघल सम्राट अकबर (Mughal emperor Akbar) याचे उद्दातीकरण करणारी आणि त्याला “महान” म्हणून उल्लेख असणारी सर्व शालेय पाठ्यपुस्तके जाळण्यात येतील, असे राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर (Rajasthan education minister Madan Dilawar) यांनी रविवारी जाहीर केले. उदयपूर येथील मोहनलाल सुखदिया विद्यापीठाच्या कार्यक्रमात दिलावर यांनी हे वक्तव्य केले आहे.

अकबर आणि महाराणा प्रताप (Maharana Pratap) यांच्यात कोणत्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही. त्यांची तुलना करणे म्हणजे राजपूत योद्धा राजा आणि राजस्थानच्या अभिमानाचा हा अपमान आहे, असे सांगत दिलावर यांनी महाराणा प्रताप यांचे वर्णन "जनतेचा रक्षणकर्ता" असे केले. ज्यांनी कधीही हार मानली नाही, त्यांची तुलना अकबराशी करण्यात आली. ज्यांच्यावर त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी सामूहिक नरसंहार घडवून आणल्याचा आरोप केला. त्यामुळे अकबरला ‘महान’ म्हणणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल, असेही ते म्हणाले. अकबर हा तिसरा मुघल सम्राट होता. त्याने १५५६ ते १६०५ दरम्यान राज्य केले.

अकबराचे 'महान व्यक्ति' म्हणून उद्दातीकरण नको

अकबर याच्यावर टीका करताना ते म्हणाले की, त्याने वर्षानुवर्षे देशाची लूट केली. आता भविष्यात कोणालाही मुघल सम्राटाचे 'महान व्यक्ति' म्हणून उद्दातीकरण करु दिले जाणार नाही. मेवाडच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महाराणा प्रताप यांना कधीच महानतेचा दर्जा देण्यात आला नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Rajasthan News : '....तर सर्व पुस्तके जाळून टाकली जातील'

"आम्ही शाळेतील सर्व वर्गांची पुस्तके पाहिली आहेत. आम्हाला (अकबर हा महान होता) अजून असे काही पुस्तकांमध्ये आढळून आलेले नाही. जर तसा उल्लेख आढ‍‍ळून आला तर ती सर्व पुस्तके जाळून टाकली जातील." असे मदन दिलावर यांनी सांगितले.

मेवाडचे राजपूत राजे महाराणा प्रताप यांचे मुघल साम्राज्याविरुद्ध, विशेषत: १५७६ मध्ये झालेल्या हल्दीघाटीच्या लढाईत त्यांनी केलेल्या जोरदार प्रतिकारासाठी स्मरण केले जाते.

Rajasthan News, Mughal emperor Akbar, Rajasthan education minister Madan Dilawar
माेठी बातमी : आप आमदार अमानतुल्ला खान यांना अटक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news