Middle East War: सौदी, युएईचा मोठा निर्णय; आखातातील युद्ध वाढणार? भारताच्या संरक्षण मंत्र्यांचीही उच्चस्तरीय बैठक

Middle East War
Middle East Warpudhari
Published on
Updated on

Middle East War: इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता २५ व्या दिवशी पोहचलं आहे. जरी अमेरिकेनं पाच दिवसाचे सीज फायर घोषित केलं असलं तरी इराणने मात्र इस्त्रायलवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. त्यातच आचा मध्य पूर्वेची अमेरिकेचे सहकारी देश सौदी अरेबिया, युएई यांनी काही मोठे निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार सौदी आणि युएईने अमेरिकेला इराणविरूद्धच्या युद्धात त्यांचे लष्करी बेस वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यातच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

Middle East War
PM Modi CCS Meeting: मध्यपूर्वेतील संघर्षावर पंतप्रधान मोदींची तातडीची बैठक; सीसीएसमध्ये सुरक्षेचा सविस्तर आढावा

सौदीचा मोठा निर्णय

द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार सैदी अरेबियाने किंग फाहद एअर बेस अमेरिकेच्या लष्कराला वापरण्यासाठी सहमती दर्शवली आहे. यापूर्वी सौदी आणि काही आखाती देशांनी इराणविरूद्ध त्यांच्या भूमीचा वापर करण्याची परवानगी दिली नव्हती. आता या भूमिकेत बदल होताना दिसत आहे.

Middle East War
India Canada uranium deal | भारत - कॅनडामध्‍ये युरेनियम पुरवठ्याबाबत ऐतिहासिक करार, PM मोदी- कॅनडाचे कार्नींमध्‍ये चर्चा

युएईनेही सुरू केली कारवाई

दुसरीकडे युएईने इराणशी संबंधित एसेट्सविरूद्ध करावाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी इराणी लोकांच्या मालकीची असलेली हॉस्पिटल्स आणि क्लब बंद करण्यास सुरूवात केली आहे. हे पाऊल इराणचे सपोर्ट नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने उचलण्यात आलं आहे.

काही वर्तमानपत्रात इराणवर दागण्यात आलेली मिसाईल्स ही बेहरीनमधून लाँच झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळं या भागातील युद्धाची कक्षा अजून रूंदावण्याची शक्यता आहे.

Middle East War
India energy security | भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी साधला ३ वेळा संवाद

भारतातही घडामोडींना वेग

दरम्यान, भारतात देखील या घडामोडींचे पडसाद पडताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारताची तयारी कशी आहे याची माहिती दिली. दरम्यान, आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यावेळी मध्यपूर्व आशियातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर आता सरकारनं उद्या सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news