सत्येंद्र जैन यांना भेटल्यावर केजरीवाल झाले भावुक

सत्येंद्र जैन यांना भेटल्यावर केजरीवाल झाले भावुक
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी रुग्णालयात उपचार घेत असलेले आम आदमी पक्षाचे नेते व माजी मंत्री सत्येंद्र जैन यांची भेट घेतली. भेटीदरम्यान केजरीवाल चांगलेच भावुक झाले. जैन यांना पाहताच त्यांनी त्यांना मिठीच मारली.

सत्येंद्र जैन एक वर्षापासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती चांगलीच खालावली असून 35 किलो वजन कमी झाले आहे. गेल्याच आठवड्यात ते तुरुंगाच्या बाथरूममध्ये पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून मेंदूत रक्ताची गाठ झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रविवारी केजरीवाल त्यांना रुग्णालयात भेटले. जैन यांना पाहताच त्यांनी कडकडून मिठी मारली. तब्बल वर्षभरानंतर दोघा नेत्यांची भेट झाल्याने केजरीवाल चांगलेच भावुक झालेले दिसले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news